मोठी बातमी ! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ‘या’ तारखेला मतदान होणार? निवडणूक आयोगाचे संकेत

0
5

माणदेश एक्सप्रेस न्युज : नवी दिल्ली : लोकसभेची निवडणुक नुकतीच संपन्न झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता साऱ्यांनाच वेध लागले आहे ते महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे. महाराष्ट्रातील सध्याच्या विधानसभेची मुदत नोव्हेंबर 2024 मध्ये संपत आहे. यामुळे विधानसभेच्या निवडणुका कधी होणार? असा प्रश्न सर्वसामान्य मतदारांच्या माध्यमातून उपस्थित होत आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकी संदर्भात भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून महत्त्वाचे संकेत मिळत आहेत.

नोव्हेंबर मध्ये महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ संपणार असल्याने आता सर्व राजकीय पक्षांच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. राज्यात लोकसभेच्या निवडणुकीत भाजप व त्यांच्या मित्र पक्षाना मोठा झटका बसला आहे. महायुतीच्या अनेक जागा महाविकास आघाडीच्या ताब्यात गेल्या आहेत.

यामुळे आगामी विधानसभेची निवडणूक ही आणखी रंगतदार होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आतापासूनच मोर्चेबांधणी केली जात आहे. उमेदवारांच्या नावावर दोन्ही गटांमध्ये बंद दाराआड चर्चा देखील सुरू आहेत.

अशातच भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू काश्मीर या चार राज्यांमधील मतदारांच्या याद्या अद्ययावत करण्यासाठी अधिसूचना काढली आहे. यावरून या चार राज्यांच्या निवडणुकांच्या कामाला भारतीय निवडणूक आयोगाने सुरुवात केली असल्याचे स्पष्ट होत आहे. या अधिसूचनेत घरोघरी जाऊन मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या सूचना आयोगाने दिल्या आहेत. यावरून महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होऊ शकते असा अंदाज बांधला जात आहे.

सध्या विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात येण्याआधीच नवीन सरकार सत्तेवर येणे गरजेचे असते. म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या आधीच निवडणुका होणे अपेक्षित आहे. हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ हा महाराष्ट्र विधानसभेच्या आधी संपत आहे.

यामुळे महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही राज्यांमध्ये गेल्यावेळी प्रमाणेच ऑक्टोबर मध्ये निवडणुका होणार असा अंदाज आहे. 2019 मध्ये हरियाणा आणि आपल्या महाराष्ट्रात 21 ऑक्टोबरला मतदान झाले होते. यंदाही याच तारखेच्या आसपास या दोन्ही राज्यांमध्ये निवडणुका घेतल्या जातील असे म्हटले जात आहे. तथापि या संदर्भात भारतीय निवडणूक आयोगाकडून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यामुळे निवडणुका नेमक्या कधी होणार हे जाणून घेण्यासाठी आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.

हे ही वाचा 

लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंवर पलटवार म्हणाले, “भुजबळांची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करणारा तू कोण?

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here