परदेशात मशीनने हात कापल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्याने भारतीय मजुराचा मृत्यू

0
3

इटलीतील एका 31 वर्षीय भारतीय मजुराचा जड मशीनमुळे हात कापल्यानंतर त्याच्या मालकाने त्याच्यावर उपचार करण्याऐवजी त्याला रस्त्याच्या कडेला फेकून दिले, ज्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. रोमजवळील लॅझिओ येथे भाजीच्या शेतात काम करत असताना, सतनाम सिंग यांचा हात जड मशीनने कापला गेला. रोममधील भारतीय दूतावासाने बुधवारी ‘X’ वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, इटलीतील लॅटिना येथे एका भारतीय नागरिकाच्या दुर्दैवी मृत्यूच्या वृत्ताची माहिती आहे. “आम्ही स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत,” दूतावासाने अधिक तपशील न देता सांगितले. कुटुंबाशी संपर्क साधण्यासाठी आणि कॉन्सुलर मदत देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

सिंग हे पंजाबचे रहिवासी होते. इटालियन मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिंग यांचे मालक अँटोनेलो लोवाटो यांनी त्यांना आणि त्यांच्या पत्नीला एका व्हॅनमध्ये बसवले आणि त्यांना त्यांच्या घराजवळ रस्त्याच्या कडेला सोडले. “आम्ही सिंग यांच्या पत्नीच्या ओरडण्याचा आवाज ऐकला, जी मदतीसाठी हाक मारत होती, त्यानंतर आम्ही एका मुलाला पाहिले ज्याने तिला घरात नेले,” ANSA वृत्तसंस्थेने घराचे मालक इलारियो पेपे यांच्या हवाल्याने सांगितले. “आम्हाला वाटले की, तो त्यांना मदत करतोय पण नंतर तो पळून गेला,” ते पुढे म्हणाले . “मी त्याच्या मागे धावले आणि मी त्यांना व्हॅनमध्ये जाताना पाहिले आणि मी त्याला विचारले की काय झाले आणि त्यांना रुग्णालयात का नेले नाही,” पेपे म्हणाले, “मुलाने)उत्तर दिले की, त्याची (सिंग) नियमित कर्मचारी म्हणून नोंदणी नाही.”

कापलेला हात फळांच्या पेटीत ठेवला

सिंग यांना दीड तास उपचार मिळाले नाहीत. त्यांना विमानाने रोममधील रुग्णालयात नेण्यात आले, परंतु बुधवारी त्यांचे निधन झाले. लोव्हॅटोवर गुन्हेगारी निष्काळजीपणा आणि हत्येचा आरोप करून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.

 

हे ही वाचा 

बातमी कामाची ! ‘स्मार्ट मीटर’ बाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here