आटपाडी : मुख्याधिकारी यांच्या घरी चोरी करणारा गजाआड ; दहा तोळे दागिने केले हस्तगत

0
1973

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी नगरपंचायतचे मुख्याधिकारी वैभव हजारे यांचे राहत्या घरी चोरी करणाऱ्या चोरट्याला आटपाडी पोलीसांनी अटक केली आहे.

 

देवगण विजय ऊर्फ बापु पवार (वय २४) या चोरट्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून दहा तोळे सोन्याचे दागिने पोलीसांनी हस्तगत केले असून, त्याचा दुसरा साथीदार अमोल विजय ऊर्फ बापू पवार (वय ३०), विजय ऊर्फ बापू पवार (वय २७) सर्व रा. मापटेमळा हे आरोपी फरार आहेत.

 

याबाबात अधिक माहिती अशी, मुख्याधिकारी वैभव हजारे यांच्या घरी २६ डिसेंबर रोजी चोरी झाली होती. यावेळी चोरट्यांनी पाच ग्राम वजनाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, 51 ग्राम वजनाचे सोन्याचे गंठण लंपास केले होते. याबाबत आटपाडी पोलिसात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुशंगाने आटपाडी पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक विनय बहिर यांनी आटपाडी पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार यांना गुन्हा उघड करण्याच्या सुचना दिलेल्या होत्या. त्या अनुशंगाने आटपाडी पोलीस ठाणेकडील सपोनि विशेंद्रसिंग बायस, पोहेकों दादासाहेब ठोंबरे, यांनी आरोपीने गुन्हा केलेल्या पद्धतीनुसार तपासास सुरुवात केली. यावेळी आरोपींचे मोबाईल नंबर प्राप्त करुन त्याआधारे त्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करुन आरोपी देवगण विजय ऊर्फ बापु पवार, रा. मापटे मळा, आटपाडी यास पकडुन त्याचेकडुन मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. तर त्याचे अन्य दोन साथीदार फरारा आहेत. दरम्यान आटपाडी पोलीसांनी या गुन्हाचा तपास हा अत्यंत कौशल्यपूर्ण करुन गुन्हा उघडकीस आणला आहे.