टेंभू योजनेत भ्रष्टाचार, कारवाईसाठी आमरण उपोषण ; डेप्युटी. इंजि. शिवाजी पाटील यांची खातेनिहाय चौकशीची मागणी

0
703

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील आंबेवाडी, बोंबेवाडी, पिंपरी खुर्द, विठ्ठलापूर उंबरगाव, पुजारवाडी पांढरेवाडी (दि), दिघंची या गावांना पूर्ण क्षमतेने पाणी मिळावे व टेंभू योजनेत भ्रष्टाचार करणारे उपभियंता शिवाजी पाटील यांना तातडीने निलंबित करावे. यासह अन्य मागण्यासाठी दिघंची येथील शेखर रणदिवे, नवनाथ रणदिवे, बळीराम रणदिवे, अशोक पवार, राहुल बुधावले, आश्विनी ठोकळे या युवक सोमवार पासून आटपाडी तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत.

 

आटपाडी तालुक्यातील पूर्वीच्या नकाशानुसार, गोयबा मंदिर लाईन करून शेरेवाडी, विठ्ठलापूर, निंबवडे ओड्यावरील कोळेकर वस्ती बंधारा, गळवे बंधारा, पाटील वस्ती बंधारा, नवीन कोप बंधारा, भवानीनगर, दिघंची हद्दीतील भाखरखडा, मान नदीवरील यादव मळा बंधारा, खवासपूर बंधारा, पांढरेवाडी, पुजारवाडी अशी करण्यात यावी, सदर लाईन ही यादव मळा बंधाऱ्यापासून खवासपूर येथे जोडल्यास अंतर ही वाचेल व शेतकऱ्यांना पाणी मिळून दिलासा मिळेल.

 

कौठळी येथून जात असलेल्या लाईनवर शेरेवाडी, कौठळी, देशमुखवाडी, समाविष्ट करण्यात यावे, देशमुख वाडी कौठळी, विठलापूर, शेरेवाडी, दिघंची या गावांना वगळून काम गुरुत्व नलिका (सायपण पद्धत) या योजनेत समाविष्ट केल्यामुळे शासनाचा अधिकचा खर्च कमी होईल व उर्वरित गावांना त्याचा लाभ होईल या दृष्टीने करण्यात यावी. स्वस्तिक कंपनीमार्फत चालू असलेल्या कामथ या लाईनची विभागीय चौकशी करण्यात यावी, दुसऱ्या ठेकेदाराची नियुक्ती करावी.सदरील काम उत्कृष्ठ दर्जाचे होईल. टेंभू उपसा सिंचन योजनेचे उपविभागीय कार्यालय आटपाडी येथे करण्यात यावे.

 

टेंभू योजनेला स्वर्गीय क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांचे नाव देण्यात यावे. आटपाडी तालुक्यातील चालू असलेल्या कामाचे, मागील झालेल्या कामाचे मूळ गट नकाशे डिझाईन नकाशे गुगल डिझाईन नकाशे व गावनिहाय अधिकृत क्षेत्राची माहिती उपलब्ध करून द्यावी. डेप्युटी इंजिनिअर शिवाजी पाटील हे यांची दप्तरी चौकशी करावी, व त्यांचे सहकारी जे.ई. जाधव यांचीही चौकशी करून निलंबन करण्यात यावे. या मागण्यासाठी उपोषण सुरु करण्यात आले आहे.