“तिरुपती मंदिरात लाडू बनवण्यासाठी प्राण्यांची चरबी वापरली गेली”- सीएम चंद्राबाबू नायडू यांचा दावा

0
583

 

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी धक्कादायक दावा करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी बुधवारी मागील वायएसआर काँग्रेस सरकारवर आपल्या कार्यकाळात प्रसिद्ध तिरुपती मंदिरात लाडू बनवण्यासाठी निकृष्ट घटक आणि प्राण्यांची चरबी वापरल्याचा आरोप केला. तसेच चंद्राबाबू नायडू म्हणाले की, जगन प्रशासनाने तिरुपती प्रसादात तुपाऐवजी प्राण्यांच्या चरबीचा वापर केल्याचे जाणून आश्चर्य वाटले. करोडो भाविकांच्या धार्मिक भावनांचा आदर करू शकलेल्यांना लाज वाटली पाहिजे.

तिरुपतीच्या श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात तिरुपती लाडू अर्पण केले जातात. तसेच मंदिर तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) द्वारे प्रशासित आहे. चंद्राबाबू नायडू यांनी एनडीए विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत संबोधित करताना हा दावा केला. मुख्यमंत्री नायडू म्हणाले की, आता शुद्ध तुपाचा वापर केला जात आहे, त्यामुळे गुणवत्ता सुधारली आहे.

तसेच त्याचवेळी चंद्राबाबू नायडूंच्या या आरोपांवर वायएसआर काँग्रेसने प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार वायव्ही सुब्बा रेड्डी यांनी नायडूंवर तिरुपती मंदिराच्या पावित्र्याला हानी पोहोचवल्याचा आरोप केला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here