आटपाडी : अमोल बाबर यांच्या निवडीने स्व.आम.अनिलभाऊ बाबर गटात उत्साही वातावरण

0
20

माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : स्व. आमदार अनिल बाबर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या सांगली जिल्हा बँकेच्या संचालकपदी त्यांचे पुत्र विटा नगरपालिकेचे माजी नगरसेवक अमोल बाबर यांची निवड झाली. जिल्हा सहकार उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा संचालकांची बैठक झाली. या बैठकीत अमोल बाबर यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले.

खानापूर विधानसभेचे स्व. आमदार अनिलभाऊ बाबर हे खानापूर तालुका विकास सोसायटी गटातून जिल्हा बँकेचे संचालक झाले होते. त्यांच्या निधनाने रिक्त जागेवर नूतन संचालकांची निवडीसाठी जिल्हा बँकेने राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणकडे प्रस्ताव पाठवला होता. प्राधिकरणच्या मंजुरीनंतर नवीन संचालकाची निवड गुरुवारी झाली आहे.

आज गुरुवारी निवडीसाठी प्रक्रिया सुरु झाली. अर्ज भरण्याची मुदत संपेपर्यंत केवळ अमोल अनिल बाबर यांचा एकच अर्ज दाखल झाला. यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी अमोल बाबर यांची जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक, उपाध्यक्षा जयश्री पाटील, यांच्यासह बँकेचे सर्व संचालक उपस्थित होते.