माणदेश एक्सप्रेस न्युज : विटा/प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. खानापूर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर व सांगली जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाचे माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर यांचा मोठा प्रभाव दिसून येत आहे.
सोमवारी विसापूर सर्कलच्या गाव भेटी दरम्यान सर्व गावामध्ये ‘ब्रम्हानंद’ च्या जयघोषाचाच आवाज घुमला. यावेळी माजी समाज कल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर व भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील यांनी गावगाड्यातील लोकांच्या अडचणी जाणून घेतल्या. यामध्ये मोराळे, शिरगांव, धोंडेवाडी , हातनुर, पेड, विजयनगर,कचरेवाडी, नरसेवाडी या गावांना भेटी दिल्या.
यावेळी नागरिकांनी गेल्या अनेक वर्षांपासून विसापूर सर्कल मधील जनतेला गृहीत धरूनच विट्याच्या नेत्यांनी राजकारण केल्याचा आरोप केला. विट्याच्या पाटील तसेच बाबर गटाला यापूर्वी सक्षम विरोधक व जाब विचारणारे कोण भेटले नाही. मात्र पडळकर बंधूंनी गावगाड्यातील ,तळागाळातील जनतेला समान न्याय देण्याची भूमिका व गावगाड्यात राजकीय सत्ता देण्याचे भूमिकेने विरोधकांचे धाबे दणाणले आहे. विसापूर सर्कलमध्ये केलेल्या कार्यानेच ब्रम्हानंद पडळकरांचा आमदार म्हणूनच आवाज घुमला आहे.
गाव भेटी दरम्यान ब्रम्हानंद पडळकर यांनी पेड येथील बॅ.टी.के. शेंडगे विद्यालय व क. महाविद्यालयला भेट दिली. यावेळी प्राचार्य प्रशांत स्वामी व सर्व शिक्षकांनी स्वागत केले. यावेळी यावेळी जिल्हा सचिव पंकज दबडे, पांडुरंग जाधव, सुंदर पाटील, स्वप्निल शेंडगे, नंदकुमार जाधव, दादासो पाटील, शत्रुघ्न पाटील, शंकर मोरे, शिवाजी गुरव, सौ. रेश्मा आठवले, सौ. मेघा पाटील, विलास भाऊ पाटील, यशवंत सोनटक्के, पोपट सोनटक्के, अरुण भोसले, प्रकाश पाटील, हणमंत पाटील, स्वप्निल शेंडगे, दादासो पाटील, निलेश पाटील. मोराळे गावचे सरपंच बाजीराव पाटील, भारत पाटील, माणिक बुरंगले, बापुसो हिंगमिरे, विजयनगरचे पंढरीनाथ कणसे, गोरख सुर्यवंशी, धनाजी पवार, अभिजीत पवार, दादासो पाटील, कचरेवाडी सरपंच सुर्याजी सुर्यवंशी, माजी सरपंच विठ्ठल सुर्यवंशी, मच्छिद्र पाटील , जनार्दन जगदाळे, दादासो पाटील, अधिकराव सुर्यवंशी, नरसेवाडीचे धनाजी जाधव, संदीप सुर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.