मेष : पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा होईल. व्यर्थ गोष्टींवर चर्चा करू नका. तुमचा अनमोल वेळ वाया जाईल. तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. फिटनेसकडे अधिक लक्ष द्या. तुमच्या कुंडलीत काही बदल होणार आहेत. आज मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे. पण ही संधी सोडू नका. अधिक विचार करू नका.
वृषभ : तुमच्या आयुष्यातील खासगी गोष्टी कुणालाही सांगू नका, नाही तर अनर्थ ओढवेल. प्रत्येकजण तुमच्यावर खुश नाही. काही लोक तुमचा गैरफायदा घेऊ इच्छितात. त्यामुळे इतरांवर अधिक विश्वास ठेवू नका. तुमच्या आजच्या योजना मार्गी लागतील. एखाद्याची खूप वेळ वाट पाहावी लागणार आहे. धार्मिक कार्यात व्यस्त व्हाल.
मिथुन : तुमच्या मनाप्रमाणे सर्व काही चालेल. मित्र मंडळी आणि नातेवाईकांना आर्थिक मदत कराल. कामाच्या ठिकाणी मन प्रसन्न राहील. कोणतीही कटकट राहणार नाही. व्यवसायात अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. नवे प्रोजेक्ट सुरू कराल. लांबचा प्रवास संभवतो. घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. विवाह करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला नाही. विद्यार्थ्यांचं अभ्यासात मन रमेल.
कर्क : कुटुंबासोबत काही वेळ घालवाल. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांना मदत कराल, त्यांच्या मनातील अनामिक भीती दूर कराल. सर्व बाधा दूर होईल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. तुमच्या कठोर मेहनतीचे तुम्हाला फळ मिळेल. शेतीची कामे उरकून घ्याल. गावाकडे जाण्याचा योग आहे. नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार कराल. गुंतवणूक करण्यावर भर द्याल. घरातील सदस्यांसोबत वाद होतील. अचानक जुना मित्र भेटेल, जुन्या आठवणींना उजाळा द्याल.
सिंह : आजच्या दिवशी खर्चावर अधिक भर द्याल. आरोग्य चांगलं राहील. पण प्रवासाची दगदग होईल. व्यायाम आणि योगा सारख्या गोष्टी करा. तुमची दिनचर्या व्यवस्थित ठेवण्याचं काम करा. आरोग्य संपदा टिकवून ठेवायची असेल तर तुम्हाला कठोर मेहनत करावी लागेल. खरेदीविक्रीच्या भानगडीत पडू नका. कोर्टकचेरीची प्रकरणं मार्गी लागतील. धार्मिक कार्यात समरसून भाग घ्याल.
कन्या : तुमच्यासाठी आराम, चिंतन, मनन करण्यासाठीचा हा चांगला महिना आहे. तुम्ही सिंगल असाल तर जोडीदार मिळेल. रिलेशनशीपमध्ये असणाऱ्यांना गुड न्यूज मिळेल. रिलेशनशीपमधील पार्टनर सुखदु:खात साथ देईल. प्रत्येक कठिण प्रसंगात ही व्यक्ती तुमच्यासोबत सावलीसारखी असेल. संधी चालून येण्याचा आजचा दिवस आहे. आज तुमचं भाग्य उजळेल. नकारात्मक गोष्टी दूर ठेवा. जीवनाचा आनंद घ्या, निसर्ग सहलीला जाण्याचा बेत आखाल.
तुळ : एखाद्या व्यक्तीशी डेटिंग करण्याचा विचार कराल. तुमचं फिटनेस उत्तम असेल. इतक्या महिन्यांपासून करत असलेल्या मेहनतीचं आज फळ मिळेल. नोकरीचा शोध घेणाऱ्यांना नोकरी मिळेल. चांगला घसघशीत पगाराची नोकरी मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार असाल तर पटकन सुरू करा. व्यवसायात कोणतीही अडचण असणार नाही. चार पैसे खिशात येतील. पार्टीचं आयोजन कराल. नोकरीत कनिष्ठांना विशेष सहकार्य कराल.
वृश्चिक : तुमचं करिअर कुठे अडकून बसलंय हे आईवडिलांना सांगाल. तुमच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न कराल. नोकरीतील लोकांना वरिष्ठांचा त्रास सहन करावा लागेल. उद्योगात पाहिजे तशी बरकत येणार नाही. कर्जाचा डोंगर वाढत राहील. देणेकरी तगादा लावतील. विवाह जुळता जुळता मोडेल. मन खचून जाईल. पण दुपारनंतर ग्रह बदलून तुमची गाडी रुळावर येईल. पुन्हा नव्याने पाय रोवून उभं राहाल. संध्याकाळपर्यंत एक मोठी न्यूज कानावर येण्याची शक्यता आहे.
धनु : आराम करण्यासाठी वेळ काढाल. मनात एक अस्पष्ट बेचैनी वाढेल. करिअरच्या नव्या पर्यायांचा शोध घ्याल. पण तुम्ही सर्व काही सोडायला तयार होणार नाहीत. तुम्ही वेगळ्या दिशेने पाऊळ टाकाल. तुमच्या जीवनसाथीसोबत मामूली मतभेद होतील. पण हे मतभेद योग्य रितीने हाताळले तर एक आदर्श जोडी म्हणून तुमच्याकडे पाहिलं जाईल. प्रवासाचा योग आहे. बाहेरचे खाद्यपदार्थ खाऊ नका. आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. समाजकार्यात प्रतिष्ठा मिळेल. कवी, साहित्यिक, कलाकार आणि खेळाडूंसाठी आजचा दिवस अत्यंत चांगला जाईल.
मकर : सामाजिक कार्यात भाग घ्याल. राजकारणातील लोकांना मोठी संधी मिळेल. वरिष्ठांचे आशीर्वाद लाभतील. या महिन्यात भरपूर प्रेम आणि आनंद मिळेल. नातेवाईकांशी भेटीगाठी होतील. गावाच्या मंडळींचा सहवास लाभेल. शेअर मार्केटमध्ये फायदा होईल, पण गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. वाहन सावकाश चालवा. दूरचा प्रवास टाळा. घरातील मंडळींना वेळ द्या. तब्येतीकडे लक्ष द्या. वाजवीपेक्षा जास्त बोलू नका. जीभेवर नियंत्रण ठेवा. गोड बोलणाऱ्यांपासून सावध राहा. कधी त्रास देतील सांगता येत नाही.
कुंभ : तुमचा व्यवसाय जेमतेम सुरू आहे. पण त्यावर अधिक विचार करून वेळ वाया घालवू नका. जास्तीत जास्त फंड कसा उभा राहील आणि अधिकाधिक क्लायंट कसे मिळतील यावर भर द्या. तुम्ही कठोर मेहनत करा आणि नियोजनबद्ध रित्या पुढे जा. धार्मिक कार्यात स्वत:ला गुंतवून घ्या. आज अचानक धनलाभ होईल. उधारी वसूल करण्याचा प्रयत्न करा. नवी वस्तू खरेदी कराल. अंहकार बाजूला ठेवा. फिटनेसवर भर द्या.
मीन : तुम्ही तुमच्या चिंतांविषयी खूप विचार करता. तुम्ही जेही कराल त्यात तुम्हाला यश मिळेल. दीर्घकालीन लक्ष्य ठेवा, योजना आखा, तुमचे संकल्प पूर्ण होतील. तुम्हाला प्रवासाचा योग आहे. पण प्रवासाला जाताना वाहन जपून चालवा. मालमत्तांचे वाद सुटण्याचे संकेत आहेत. कुटुंबीयांशी वाद होतील. तब्येतीची कुरकुर जाणवेल.
(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल माणदेश एक्सप्रेस कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)