खरसुंडी ग्रामपंचायतीचे वॉटर एटीएम बंद ; नागरिकांना होतोय त्रास

0
15
फोटो : बंद अवस्थेत असलेले खरसुंडी ग्रामपंचायतीचे वॉटर एटीएम
फोटो : बंद अवस्थेत असलेले खरसुंडी ग्रामपंचायतीचे वॉटर एटीएम

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील खरसुंडी ग्रामपंचायतीने नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे या हेतून बसविलेले वॉटर एटीएम बंद पडले आहे. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, ग्रामपंचायतीने याबाबत तातडीने लक्ष घालून वॉटर एटीएम दुरुस्त करावे अशी मागणी उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे आटपाडी तालुकाप्रमुख शेखर यांनी केली आहे.

खरसुंडी येथे ग्रामपंचायतीने गावातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी वॉटर एटीएम बसविले होते. यामध्ये पाच रुपयांचे नाणे टाकून नागरिकांना २० लिटर पिण्याचे पाणी मिळत होते. परंतु सदरचे वॉटर एटीएम बंद पडल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी खाजगी वॉटर एटीएम मध्ये जावे लागत असून, याचा नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.

सदरचे वॉटर एटीएम बंद पडले असून याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे आटपाडी तालुका प्रमुख शेखर निचळ यांनी खरसुंडी ग्रामपंचायतकडे तक्रार करत बंद पडलेले, वॉटर एटीएम तत्काळ चालू करावे अशी मागणी केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here