आजचे राशीभविष्य: ‘या’ राशीला उत्साहवर्धक बातम्या ऐकायला मिळतील…रखडलेली कामे पूर्ण होतील.

0
94

 

मेष – मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागेल. त्याशिवाय तुमची कोणतीच कामे पूर्ण होणार नाही. पाहुण्याच्या येण्याने तुमचा खर्च वाढू शकतो. कुटुंबातील सदस्य त्यांचे स्वागत करण्यात व्यस्त असतील. तुम्हाला आज नशिबाची साथ मिळेल. त्यामुळे जुनी रखडलेली कामे पूर्ण करण्याच्या प्रयत्न करा. मुलांना नोकरीच्या क्षेत्रात आज यश मिळेल.

वृषभ -आजचा दिवस तुमचा खूप व्यस्त असू शकतो. त्यामुळे तुम्हाला खाण्याच्या सवयींवर विशेष नियंत्रण ठेवावे लागेल. पोटदुखी किंवा पोट फुगण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कामाच्या ठिकाणी मोठ्या व्यक्तीचा सल्ला प्रभावी ठरेल. ज्यामुळे व्यवसायात प्रगती होईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीनुसार फळ मिळेल. मित्रांसोबत धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

मिथुन -आज तुमची सर्व नियोजित कामे पूर्ण होतील त्यामुळे तुमचा मूड चांगला राहिल. राजकारणाशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. मुलांच्या बाजूने सकारात्मक गोष्टी घडतील. ज्यामुळे त्यांचे भविष्य मजबूत होईल. जोडीदार तुम्हाला सर्व प्रकारची मदत करेल. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमघ्ये वाद होऊ शकतात. ते टाळण्याचा प्रयत्न करा

कर्क -आज तुम्हाला अनावश्यक खर्च करावा लागेल. ज्यामुळे आर्थिक नुकसान होईल. कला-क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे अडथळे दूर होतील. कुटुंबासोबत जत्रेत किंवा पिक्चर बघायला जाऊ शकता. वडिलांचा सल्ला तुम्हाला कार्यक्षेत्रात फायदेशीर ठरेल. जोडीदाराशी वाद होतील

सिंह -आज तुम्हाला पैसे मिळतील. ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल. कुटुंबात अशांततेचे वातावरण असेल. ज्यामुळे मन अस्वस्थ राहिल. धैर्याने आणि संयमाने काम करा. घाई केल्याने नुकसान होऊ शकते. आज धार्मिक कार्यात रुची वाढेल. गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. ज्यामुळे तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. जोडीदाराच्या सल्ल्याने कामात यश मिळेल.

कन्या – आज तुम्हाला कुटुंबात मालमत्तेबाबत काही तणाव निर्माण होऊ शकतात. ज्यामुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. अन्यथा वाद वाढू शकतात. मोठ्यांच्या सल्ल्याने वाद सोडवला जाऊ शकतो. व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रखडलेली कामे मार्गी लागतील. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात तणावपूर्ण स्थिती असेल. विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करावी लागेल. तरच यश मिळेल.

तुळ – आज तुम्हाला समाजात मान-सन्मान मिळेल. त्यामुळे तुम्ही आनंदी असाल. कोर्टात सुरु असलेले कोणतेही प्रकरण आज संपेल. रिअल इस्टेट व्यवसायात लाभ होईल. मुलांच्या यशाची बातमी ऐकून तुमचे मन आनंदाने भरुन जाईल. कुटुंबात काही शुभ घटना घडतील. ज्यामुळे तुम्ही आनंद साजरा कराल. आज संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक -आज राजकारण आणि सामाजिक क्षेत्रात कठोर परिश्रम करण्याची आवश्यकता आहे. शत्रूची बाजू आज कमकुवत राहिल. मामाकडून पैसे मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगल्या संधी मिळतील. ज्यामुळे भविष्यात व्यवसायाला नवीन गती मिळेल. आज वडिलांना ऑफिस किंवा बिझनेसच्या कामात मदत कराल. तुमचा मूड बरा असेल. दैनंदिन गरजांसाठी काही वस्तू खरेदी कराल. पैसे जपून खर्च करा

धनु -आज नवीन खर्च तुमच्या समोर येतील. इच्छा नसतानाही पैसे खर्च करावे लागू शकतात. यामुळे बजेट बिघडू शकते. दिवसभरात प्रवास घडण्याची शक्यता आहे. सावध राहून रागावर नियंत्रण ठेवा. मुलांकडून काही उत्साहवर्धक बातम्या ऐकायला मिळतील. भविष्याबाबतची चिंता कमी होईल. वडिलांची तब्येत बिघडू शकते. काळजी घ्या

मकर -आज कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. अन्यथा, भविष्यात तुम्हाला त्रास होईल. आज तुम्हाला नोकरीची कोणतीही ऑफर आली तर ती स्विकारा. भविष्यात नुकसान सहन करावे लागेल. ज्यामुळे आर्थिक स्थिती डळमळीत होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नवीन संपर्क तयार कराल. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लांब जावे लागू शकते. लव्ह-लाईफमध्ये नाते सुधारेल.

कुंभ -आज पैशांच्या बाबतीत अधिक काळजी घ्यावी लागेल. कोणत्याही प्रकारचे व्यवहार टाळा. जास्त खर्चामुळे तुम्हाला एखाद्याकडून कर्ज घ्यावे लागू शकते. खूप दिवसांपासून रखडलेले काम आज पूर्ण होईल. घरातील सदस्य आज आनंदी असतील. आरोग्याची आज काळजी घ्यावी लागेल.

मीन -आज जोडीदाराची प्रगती पाहून तुमचे मन प्रसन्न होईल. प्रॉपर्टी घेताना विचार करुन घ्याल, त्यात पैसे अधिक खर्च होतील. व्यवसायात आज नवीन उपकरणे वापरल्याने तुम्हाला फायदा होईल. जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. विद्यार्थ्यांना मित्रांच्या मदतीने काम करण्याची संधी मिळेल. कौटुंबिक व्यवसायात वडिलांचे पूर्ण सहकार्य मिळेल.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)