ताज्या बातम्यागुन्हेमहाराष्ट्र

महिला स्वतःच्या मुलीची हत्या करून ,तिचा मृतदेह घेऊन गेली थेट पोलीस स्टेशनमध्ये

महाराष्ट्रातील नागपुर मध्ये थरकाप उडवणारी एक घटना घडली आहे. एका महिलेने आपल्याच मुलीची हत्या केली व तिचा मृतदेह घेऊन तिने थेट पोलीस स्टेशन गाठले. व केलेला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी महिलेला अटक केली आहे.नागपूर मध्ये एक महिला अचानक पोलीस स्टेशनमध्ये मुलीचा मृतदेह घेऊन आली. हे पाहिल्यामुळे सर्वजण गोंधळात पडले. पोलिसांनी काही विचारायच्या आता महिलेने आपला गुन्हा कबूल केला.

ही महिला म्हणाली की, ती खूप वेळेपासून एका तरूणासोबत लिव-इन मध्ये राहत होती. या दरम्यान दोघांना एक मुलगी झाली. पण नंतर त्या तरुणाने दुसऱ्या मुलीसोबत संबंध ठेवण्यास सुरवात केली. या गोष्टीला घेऊन दोघांमध्ये रोज वाद होत होते. सतत होणाऱ्या या वादामुळे डोक्यात राग घालून या महिलेने स्वतःच्या पोटाच्या मुलीचीच हत्या केली.

हे प्रकरण नागपूर MIDC मधील आहे. सोमवारी रात्री ही महिला अचानक पोलीस स्टेशनमध्ये आली व या महिलेच्या हातात मृतदेह पाहून पोलिसांना धक्काच बसला. महिलेने गुन्हा कबूल केला. पोलिसांनी या चिमुकलीला लागलीच रुग्णालयात नेले पण काहीही उपयोग झाला नाही डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी महिलेला अटक केली असून पूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button