सुपरस्टार अल्लू अर्जुनने पत्नीसोबत ढाब्यावर बसून केलं जेवण; साधेपणानं जिंकली सर्वांची मनं!

0
3

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुन हा खरंतर ‘स्टायलिश स्टार’ म्हणून ओळखला जातो. अल्लू अर्जुनची स्टाइल चाहत्यांना प्रचंड आवडते. मग ते चालण्या-बोलण्याची असो किंवा कपड्यांची. मात्र सध्या तो त्याच्या साधेपणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. अल्लू अर्जुनचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तो त्याच्या पत्नीसोबत मिळून एका साध्या ढाब्यावर जेवताना दिसतोय. इतका मोठा स्टार असून कोणत्याही फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये एसीमध्ये बसून जेवण्यापेक्षा अत्यंत साध्या ढाब्यावर जेवताना पाहून नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत.

‘अल्लू अर्जुन आणि स्नेहा.. एका रस्त्याच्या कडेवरील ढाब्यावर दिसले. या व्यक्तीचा साधेपणा मन जिंकून घेतो’, असं लिहित एका युजरने हा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये दिसणारा ढाबा अत्यंत साधा आहे. तिथल्या टेबलाबर बसलेला अल्लू अर्जुन फोनवर बोलताना दिसतोय. त्याच्या बाजूला बसलेली पत्नी जेवताना दिसतेय. या फोटोवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. ‘म्हणून बॉलिवूडपेक्षा साऊथचे कलाकार अधिक लोकप्रिय असतात’, असं एकाने लिहिलं. तर ‘इतक्या मोठ्या स्टारचा हा साधेपणा खरंच कौतुकास्पद आहे’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here