मोबाईल घेतल्याच्या रागात 16 वर्षीय मुलाने गोळ्या झाडून केली आई, वडीलांसह बहिणीची हत्या

0
2

ब्राझीलमध्ये पालकांनी मोबाईल हिसकावून घेतल्याच्या रागात एका 16 वर्षीय मुलाने अख्या कुटुंबाला संपवल्याची घटना घडली आहे. त्याने आई, वडील आणि बहिणीची हत्या केल्याची कबूली दिली आहे. सध्या ब्राझील पोलिस घटनेचा तपास करत आहे. इसाक टावरेस सँटोस (५७), त्यांची पत्नी सोलांज अपरेसिडा गोम्स (५०) आणि त्यांची मुलगी लेटिसिया गोम्स सँटोस अशी मृतांची नावे आहेत. त्याचे वडील पोलीस अधिकारी होते.

मिररने प्रकाशित केलेल्या वृत्तात, सध्या अटकेत असलेल्या मुलाने पोलिसांसमोर कबुली दिली आहे की त्याने खून करण्यासाठी त्याच्या वडिलांच्या बंदुकीचा वापर केला. त्याने आधी त्याच्या वडिलांना गोळी मारून ठार केले. या घटनेत त्यांनी आरडाओरडा केला. नक्की काय घडलं हे पाहण्यासाठी त्याची बहिणी तेथे आली तेव्हा त्याने तिच्यावरही गोळी झाडली. नंतर आई कामावरून घरी आली तेव्हा तिच्यावरही गोळी झाडली.

ब्राझीलमधील साओ पाउलो येथील विला जग्वारा येथे ते राहत होते. रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली. घटनेनंतर मुलाने पोलिसांना बोलावून गुन्ह्यांची कबुली दिली. पोलिसांनी आज बुधवारी तिनही मृतदेह ताब्यात घेतले आहेत. घटनेनंतर दोन दिवस मृतदेह घरातच होते. आरोपी अल्पवयीन असल्यामुळे ज्याचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. आरोपी मुलाने दिलेल्या कबूलीनुसार, त्याने खून करण्याच्या एक दिवस आधी खुनाचा कट रचला होता. पालकांनी त्याचा अपमान केला त्यामुळे तो रागात होता शिवाय त्याचा फोनही जप्त केला होता, जो त्याला शालेय कामासाठी आवश्यक होता. तिन खून करूणही मुलाने त्यची दैनंदिन दिनचर्या सुरू ठेवली होती. शाळेत जाणे आणि आठवड्याच्या शेवटी जिमला जाणे देखील सुरू ठेवले.

इसाक टावरेस सँटोस हे साओ पाउलो येथील जुंदियाई येथे पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होते. स्थानिक परिषदेच्या वनीकरण विभागात कार्यरत होते. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here