टाटा मेमोरियल सेंटरमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी; थेट मुलाखतीमधून होणार निवड

0
1

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. विशेष म्हणजे मुंबईमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे नक्कीच आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे थेट मुलाखतीमधूनच उमेदवाराची निवड ही केली जाणार आहे. कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्याचे अजिबातच टेन्शन उमेदवाराला अजिबातच नाहीये. चला तर मग उशीर न करता उमेदवारांनी फटाफट भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

टाटा मेमोरियल सेंटरसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. टाटा मेमोरियल सेंटरमध्ये अपघाती वैद्यकीय अधिकारी या पदासाठी ही भरती सुरू आहे. एमबीबीएसची पदवी असलेले उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. यासोबतच कामाच्या अनुभवाची अट देखील लागू करण्यात आलीये. एक वर्षाचा किमान अनुभव उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 40 पर्यंत असावे. निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार देखील मिळणार आहे. 84 हजार पगार उमेदवारांना मिळणार आहे. https://tmc.gov.in/index.php/en/ या लिंकवर आपल्याला भरती प्रक्रियेची माहिती मिळेल. https://tmc.gov.in/m_events/Events/JobDetail?jobId=28972 येथे आपल्याला भरती प्रक्रियेची अधिसूचना वाचायला मिळेल.

27 मे 2024 रोजी भरती प्रक्रियेसाठी मुलाखती पार पडतील.एच.आर.डी. विभाग, आउटसोर्सिंग सेल, चौथा मजला, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, डॉ. ई. बोर्जेस रोड, परळ येथे उमेदवारांना मुलाखतीसाठी उपस्थित राहवे लागेल. 9.30 पर्यंत उमेदवारांना मुलाखतीसाठी हजर राहवे लागेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी आहे.

उमेदवारांना दिलेल्या वेळेमध्ये भरती प्रक्रियेसाठी पोहचणे आवश्यक आहे. उशीरा आलेले उमेदवारांना ग्राह्य धरले जाणार नाहीये. गेल्या काही दिवसांपासून टाटा मेमोरियल सेंटरकडून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जातंय. काही दिवसांपूर्वीच एक भरती प्रक्रिया पार पडलीये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here