‘राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला 11 लाखांचं बक्षीस’- संजय गायकवाड

0
353

राहुल गांधी यांनी त्यांच्या अमेरिकेतील दौऱ्यावर भारतातील आरक्षणावर भाष्य केले. एका दिलेल्या मुलाखतीत राहून गांधी (Rahul Gandhi) यांनी आरक्षण संपवण्याचे विधान केल्याचा दावा करत सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यावर भारतीय जनता पक्ष तसेच शिवसेना शिंदे गट चांगालच आक्रमक झाला आहे. राहुल गांधी यांच्या आरक्षण संपवण्याच्या विधानावरुन सध्या राजकीय वातावण चांगलेच तापले आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड(Sanjay Gaikawad)यांनी थेट राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला 11 लाखांचं बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे.

बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड म्हणाले की, जो राहुल गांधीची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस देणार आहे. राहुल गांधी यांना मागासवर्गीय, आदिवासींसह इतरांचे शंभर टक्के आरक्षण संपवायचं आहे. आरक्षण संपवण्याची भाषा करून त्यांच्या मनातील ओठावर आलं आहे. राहुल गांधी हे जे शब्द बोलले की, आम्हाला आरक्षण संपवायचंय. माझं आवाहन आहे की, जो राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस मी माझ्या वतीनं देईल.

काय म्हणाले होते राहुल गांधी?

अमेरिकेमध्ये एका मुलाखतीत बोलताना राहुल गांधी यांनी भारतातील आरक्षणावरुन महत्वाचे विधान केले होते. भारतात पक्षपातीपणा थांबेल तेव्हा आरक्षण संपवण्याचा विचार करु, मात्र सध्या देशामध्ये तशी स्थिती नाही. योग्य वेळ येईल तेव्हा याबाबत विचार केला जाईल, असे राहुल गांधी म्हणाले होते. मात्र राहुल गांधी यांनी आरक्षण संपवण्याचे विधान केल्याचा दावा करत भाजप तसेच समविचारी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली. राहुल गांधींच्या या विधानावरुन राज्यात भाजपने आंदोलनेही केली होती.

महाराष्ट्र आणि देशात आरक्षणाची आग लागली आहे. त्यातच मागासलेल्या जातींना इतर समाजांच्या बरोबरीनं उभं करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं. असं असताना राहुल गांधी यांनी विदेशात जाऊन देशातलं आरक्षण संपवायचंय, असं वक्तव्य केलं. पोटातील मळमळ त्यांनी ओकून दाखवली. संविधान धोक्यात आहे, संविधानात आपलं आरक्षण संपवणार आहे, असा फेक नरेटिव्ह पसरवला आणि दलित समाजाची मतं घेतली. असं संजय गायकवाड म्हणाले आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here