ठाकरे गटाचे फायरब्राँड नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका करण्यात आली आहे. संजय राऊत नावाचा ‘घर कोंबडा’ रोज एक आरोळी देतो. त्या कोंबड्याला मी सांगतो, की खुराड्यातून रोज बांग देऊ नकोस. तू एक पत्र लिहून दे… मनोज जरांगे पाटील यांना मी आणि ठाकरे गट मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करायला पाठिंबा देत आहे. अरे बघूया कोंबड्या तुझ्यात जोर आहे का…, अशा शब्दात रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. असे वक्तव्य केले. सांगलीच्या शिराळा इथं रयत क्रांती कार्यालयाचं उद्घाटन झालं. यावेळी बोलताना सदाभाऊ खोत यांनी राऊतांवर टीका केली आहे.
शरद पवारांवर टीका
शरद पवारांवरही त्यांनी टीका केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आग लावण्याचं काम शरद पवार करत आहेत. हे वेळीच मराठा समाजाने ओळखलं पाहिजे. सगळं दिल्यानंतर या राज्यांमध्ये मराठा समाजामध्ये दुफळी माजवण्याचे काम करत आहेत. मी अनेक वेळा वक्तव्य केले जी माणसं महाविकास आघाडीची निवडून आली. त्यांनी एक पत्र लिहावं सरकारला एक पत्र लिहावं जरांगे पाटलांना मी खासदार अमुक- अमुक लिहून देतो की मराठा समाजाला ओबीसीमध्ये समावेश करायला माझा पाठिंबा आहे, असंही सदाभाऊ खोत यावेळी म्हणाले.
रोहित पवार विद्वान माणूस आहे. तुम्ही महाराष्ट्रात आग सुटलाय. भाडोत्री सोशल मीडियाची टीम महाराष्ट्रात तुम्ही ठेवली आहे. तुम्ही लिहून द्या, रोहित पवार की मराठा समाज ओबीसीमध्ये समावेश करायला या रोहित पवाराचा पाठिंबा आहे. द्या लिहून…. हे आग लावायचे धंदे या महाराष्ट्रातून बंद करा. लोकसभेला जमलं म्हणून आता जमल ही भावना काढून टाका, अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी रोहित पवारांवर टीकास्त्र डागलं आहे.
मविआवर निशाणा
महायुतीचं सरकार सत्तेत आल्यावर अनेक चांगले निर्णय घेतले गेले आहेत. अनेक योजना या सरकारने आणल्या आहेत. पण महाविकास आघाडीचे नेते टीका करतात. पण येणाऱ्या निवडणुकीत या महाविकास आघाडीतील वळू रेड्यानं चाबकाने फोडून काढू, असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.