खासगी रुग्णवाहिकेची वाहनांना धडक, रुग्णवाहिकेत दारूच्या बाटल्या आढळल्याने खळबळ

0
17

पाथर्डी फाटा परिसरात एका मद्यधुंद कारचालकाने महिलेच्या कारला धडक दिल्याची घटना ताजी असतानाच जिल्ह्यातून दुसरी घटना धक्कादायक घटना समोर आली आहे. ओझरजवळ (Ozar) खासगी रुग्णवाहिकाने वाहनांना धडक दिल्याचा प्रकार घडला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक-धुळे महामार्गावर ओझरजवळ खासगी रुग्णवाहिकाने वाहनांना धडक दिली. शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांचे नाव आणि फोटो असणाऱ्या रुग्णवाहिका चालकाने सरकारी रुग्णवाहिकासह दोन वाहनांना धडक दिली आहे.

रुग्णवाहिकेत सापडल्या दारूच्या बाटल्या
वाहनचालक मद्यधुंद असल्याने अपघात (Accident) झाल्याचा नागरिकांचा आरोप आहे. सुहास कांदे यांचे नाव आणि फोटो असलेल्या रुग्णवाहिकेत दारूच्या बाटल्या सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र वाहनांचे नुकसान झाले असून दोन जण जखमी झाले आहेत.

पाथर्डी फाटा परिसरात कारचा अपघात
दरम्यान, अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाथर्डी फाटा परिसरात तरुणाच्या कारने महिलेच्या कारला धडक दिली. यानंतर महिलेच्या मदतीला धावलेल्या लोकांना तरुणाने दमबाजी केल्याचा प्रकार घडला. बहिण पोलीस दलात असल्याचे सांगत तरुणाने नागरिकांना दमबाजी केली. संशयित तरुण मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. तरुणाच्या दमबाजीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here