
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : राजेवाडी तलावाच्या अनुषंगाने, पाच खासदार व दहा आमदार यांनी समर्थन दिले असल्याची माहिती सादिक खाटिक यांनी दिली.
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्याच्या राजेवाडी गावातल्या म्हसवड तलावाचे फलटणचे विभागीय कार्यालय सातारा येथे, पंढरपूरचे उपविभागीय कार्यालय गोंदावले येथे तर महुद येथील पुर्वीच्या शाखा कार्यालया बरोबरच आणखी एक शाखा कार्यालय म्हसवड येथे सुरु करण्याचा नवा प्रस्ताव सातारा जिल्ह्यातील एका नेत्याच्या आग्रहावरून अधिकारी महोदयांनी राज्य शासनाकडे पाठविल्याचे समजले आहे. या कथीत प्रस्तावाच्या अनुषंगाने, आटपाडी तालुक्यावर पुन्हा मोठा अन्याय होवू शकतो.
राजेवाडीतल्या म्हसवड तलावाचे फलटणचे विभागीय कार्यालय सांगली जिल्हा जलसंपदा कडे वर्ग व्हावे. पंढरपूरचे उपविभागीय कार्यालय आटपाडी येथे सुरु करावे. आणि महुद येथील शाखा कार्यालय तलावाच्या मुख्य ठिकाणी म्हणजे राजेवाडी येथे व्हावे. राजेवाडीतल्या म्हसवड तलावाचे, १४० वर्षानंतर तरी नामकरण राजेवाडी तलाव असे केले जावे. ही आटपाडी तालुक्याच्या हिताला मोठा न्याय देणारी महत्वाची मागणी आहे. या हृष्टीने आपण सातत्याने सरकारचे लक्ष वेधल्याचे सादिक खाटीक यांनी प्रारंभीच स्पष्ट केले.
राजेवाडी तलावाच्या अनुषंगाने, आटपाडी तालुक्याच्या हिताच्या मागण्या संदर्भात, राज्यातील ५ खासदार, १० आमदार महोदयांनी राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना खास पत्रे लिहली आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे, खानापूरचे आमदार सुहास बाबर, आमदार गोपीचंद पडळकर जत, माजी मंत्री, आ.सुरेशभाऊ खाडे मिरज, आ.इद्रिसभाई नायकवडी मिरज, आ.रोहित सुमन आर.आर.आबा पाटील तासगांव-कवठेमहंकाळ, माजी मंत्री, आ.विश्वजीत कदम पलुस-कडेगांव, खासदार विशालदादा पाटील सांगली, खा. अमोल कोल्हे शिरूर, खा. अमर काळे वर्धा, माजी मंत्री, खा.फौजिया खान परभणी, आमदार उत्तमराव जानकर माळशिरस, आ. बापूसाहेब पठारे वडगांव शेरी पुणे, आ.जयंत आसगांवकर कोल्हापूर, आ.अभिजित पाटील माढा, या लोकप्रतिनिधींच्या सह, पाणी संघर्ष समितीचे प्रणेते डॉ. भारत पाटणकर कासेगांव, एबीपी माझा मराठी चॅनेल मुंबईचे मुख्य संपादक, आटपाडीचे सुपुत्र राजीव खांडेकर मुंबई या मान्यवरांचा समावेश असल्याचे सादिक खाटिक म्हणाले.