
निशिकांत पाटील : आटपाडीत जीमचे उद्घाटन
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : सध्याच्या युगात युवकांना जीमची फार मोठी आवश्यकता असून, एका होतकरू तरुणाला जीम चालू करून देणे, नवीन युवक घडवणे या तालुक्यात खूप कमी लोकांना जमले, असून त्यामध्ये अनिल पाटील यांचे नाव अग्रक्रमाने सर्वात पुढे असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते निशिकांत पाटील यांनी व्यक्त केले. आटपाडी येथे जीमच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, जगामध्ये भारत हा देश देशामध्ये युवकांची संख्या सगळ्यात जास्त असलेला देश आहे. वयाची 18 वर्षे ते 35 वर्ष या वयोगटातील तरुणांची संख्या ज्या देशांमध्ये जास्त असते तो देश विकासाबाबतीमध्ये अग्रेसर असतो. यामध्ये भारत एक नंबरला आहे. या जिल्ह्यामधील युवक हे वेगळ्या विचारसरणीचे आहेत.युवकांनी ठरवलं आणि या जिल्ह्यामध्ये खूप मोठं महायुतीचा परिवर्तन झालं. हा जिल्हा विशिष्ट पक्षाचा बालेकिल्ला मानला जात होता. युवकांनी ठरवलं काय होते ते तुम्ही युवकांनी मागच्या इलेक्शन मध्ये दाखवून दिलेल आहे.
ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन नवीन लोकांच्या सोबत राहून आपण परीवर्तनाची लढाई लढण्याच्या आवश्यकता आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी प्रत्येक व्यक्तीला मताचा एक अधिकार दिलेला आहे. एका मताचा मूल्य काय असतं ते अलीकडच्या काळात युवकांनी शिकवलेला आहे. आपल्यासारखी वयस्कर माणसं आता घरात बसतात, मत आणण्यापासून मत करण्यापर्यंत तुम्ही करता. त्यासाठी जीमची फार मोठी आवश्यकता आहे.
या जिल्ह्यामध्ये भविष्यकाळामध्ये युवकांना अतिशय सतमार्गाला आपल्या दृष्टीने आपल्या कुटुंबाला अभिप्रेत असलेलं, या देशाला अभिप्रेत असलेलं युवक घडवण्याचं काम या आटपाडी शहरामधून होईल.अशी निश्चितपणे खात्री आहे. मी भाजपा जिल्हाध्यक्ष असताना अनिल पाटील युवाचे जिल्हाध्यक्ष होते.अतिशय चांगलं काम त्यांनी केले आहे. जिथे जास्त वाद असेल तेव्हा मला सांगायचे मी तिथे जायचो. अशा युवा नेत्याला जपण्याचं काम तुम्ही युवक मंडळींनी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी युवकांनी केली.
यावेळी कार्यक्रमाला भारतदादा पाटील, माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, राजेंद्र खरात, शहाजी जाधव, महादेव जुगदर, विपुल कदम, लक्ष्मण कदम, प्रवीण माने, चंद्रकांत पाटील, बबन शिरतोडे, विशाल चव्हाण, संतोष पवार, दादासाहेब पाटील, पीएसआय राहुल कुंभार, बाळासो हाके, ज्ञानेश्वर पवार, अमोल नांगरे, यलाप्पा पवार, प्रशांत जाधव, विशाल नागणे, किरण काळे, मधुकर होळे, नरेंद्र दीक्षित, सुशांत सावत, ओंकार डूबोले, विजय जाधव, विशाल कांबळे, स्वप्निल हाके, समाधान शिनगारे, विजय पाटील, ऋषिकेश पाटील, सतीश मुढे, विकी दौंडे, सौरभ नवले, दीपक जाधव, आप्पासो जाधव, मिनीनाथ चव्हाण, दुर्गेश दांडेकर, गोपी पवार, दादासाहेब वाघमारे, विजय बनसोडे, मधुसूदन लोखंडे, बंडू सरगर, चंदु हाके, विनायक जानकर, सचिन ऐवळे, निखिल गळवे, सचिन मंडले, करण मंडले, दत्ता होळे, दिनेश सरगर, शशी हाके, दादासाहेब वाघमारे, प्राण चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
निशिकांत पाटील हे आरोग्यदूत असे नेतृत्व आहे. मी युवा मोर्चाचा जिल्हाध्यक्ष असताना माझ्यामागे अतिशय खंबीरपणे उभे राहिले. जिल्ह्यामध्ये मला प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांच्यामुळे जाता आलं, तिथे काम करायची संधी दादांमुळे मिळाली. दादांची खासियत आहे की, एखाद्याच्या पाठीमागे ठामपणे उभे राहतात. म्हणून येथून पुढे निशिकांत दादा मार्गदर्शनाखाली काम करायचे आहे.