
तहसीलदारसागर ढवळे : राजारामबापू हायस्कूलमध्ये शुभचिंतन सोहळा संपन्न
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर परिस्थितीपेक्षा आपली मनस्थिती खंबीर असायला पाहिजे, असे प्रतिपादन आटपाडीचे तहसीलदार सागर ढवळे यांनी केले. आटपाडी येथील राजारामबापू हायस्कूल येथे विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले,जे ध्येय उराशी बाळगले आहे.त्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी प्रामाणिक कष्ट केले तर यश आपल्या पायाशी लोटांगण घातल्याशिवाय राहणार नाही. याच बरोबर मी स्वतः कसं घडलो याची प्रेरणादायी माहिती देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी शुभम अकॅडमी चे संचालक तात्यासाहेब दबडे यांनी दहावीनंतरच्या करिअर बाबत मार्गदर्शन केले.हर्षदा सागर, ऋतुजा कोळेकर, संस्कृती तळे या विद्यार्थिनी आपले मनोगत केले. तर सूत्रसंचालन साईश्वरी सागर हिने केले. यावेळी यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सुरज पाटीलयांच्यासह प्रशालेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.