अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये परफॉर्म करण्यासाठी आता येणार ‘ही’ जगप्रसिद्ध गायिका

0
14

फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग आणि मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी या सोहळ्यात सहभागी झालेले. भारतीय उद्योगपती, क्रिकेटपटू यांच्यासह विविध क्षेत्रातील दिग्गज या कार्यक्रमात सहभागी झालेले. या दरम्यान आता अशी शक्यता वर्तवली जात आहे की, या महिन्याच्या अखेरीस अंबानी कुटुंबाचे दुसरे प्री-वेडिंग फंक्शन क्रूझवर होणार आहे.

बॉलिवूडमधील सेलिब्रिटी अंबानी कुटुंबाच्या खूप जवळचे आहेत. अशी क्रूझ पार्टी झाल्यास बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी यामध्ये सहभागी होऊ शकतात. रिपोर्ट्सनुसार या पाहुण्यांच्या यादीत शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांची त्यांच्या कुटुंबियांसह नावे आहेत. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरदेखील उपस्थित राहतील.

सेलिब्रिटी करणार डान्स

रणबीर आणि आलिया हे मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी आणि त्यांची पत्नी श्लोका मेहता यांचे जवळचे मित्र आहेत. अंबानी कुटुंबाशी जवळीक असल्याने अमिताभ बच्चन यांचे कुटुंबही या क्रूझ पार्टीत सहभागी होऊ शकते. अभिनेत्री जान्हवी कपूर आणि खुशी कपूर देखील या कार्यक्रमाचा एक भाग असतील, कारण ईशा अंबानी आणि अनंत अंबानी यांच्याशी त्यांची चांगली मैत्री आहे. अलीकडेच एका कॉन्सर्टनंतर ईशा अंबानी, श्लोका मेहता आणि अनंत अंबानी जान्हवीच्या घरी पोहोचले होते.

 

नुकतेच अनंत आणि राधिकासाठी आयोजित करण्यात आलेल्या एका खासगी पार्टीमध्ये रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. दीपिका पदुकोण, सोनम कपूर-आनंद आहुजा, कियारा अडवाणी-सिद्धार्थ मल्होत्रा देखील या क्रूझ पार्टीत सहभागी होऊ शकतात. त्यामुळे जामनगरमधील सोहळ्याप्रमाणे यावेळीही बॉलिवूडमधील या दिग्गजांना पार्टीसाठी आमंत्रित केले जाऊ शकते, असे मानले जात आहे.

आंतरराष्ट्रीय स्टार्सचाही समावेश

अंबानी कुटुंबीयांच्या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी उपस्थित नसणे हे शक्य नाही. जामनगरच्या कार्यक्रमात पॉप गायिका रिहानाने परफॉर्म केले होते. यावेळी शकीराचे नाव समोर येत आहे. या जगप्रसिद्ध कोलंबियन गायिकेला अनंत-राधिका यांच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये परफॉर्म करण्यासाठी आमंत्रण देण्यात आल्याचे बोलले जात आहे. शकीरा तिच्या वाका वाका, हिप्स डोंट लाय आणि व्हेनवर व्हेअरव्हेअर या गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे. इवांका ट्रम्प, मार्क झुकरबर्ग आणि बिल गेट्स हे सेलिब्रिटीही या क्रूझ पार्टीचा भाग असू शकतात.