माणदेश एक्सप्रेस न्युज/ आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. आटपाडी तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडीचे सभापती संतोष पुजारी यांचा गोवा येथे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली यांच्या इंटिग्रेटेड सोशल वेल्फेयर सोसायटी (रजि.) बेळगावी व नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन (रजि.) बेळगावी तर्फे राष्ट्रीय पुरस्कार सोहळा गोवा येथे संपन्न झाला.
आटपाडी बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी यांच्या कार्याची दखल घेवून त्यांना “राष्ट्रीय आदर्श सामाजिक सेवा गौरव पुरस्कार” देणेत आला. दिल्ली, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा राज्यातून अनेक व्यक्ती व सरकारी अधिकारी यांनी संतोष पुजारी यांच्या नावाची शिफारस केली होती.
सदरचा पुरस्कार त्यांना माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली, बेळगावीचे माजी खासदार बॅरिस्टर अमरसिंह पाटील, फाऊंडेशन चेअरमन व उद्योगपती मलेशिया राष्ट्रच्या डॉ. सीमा इंगोले, विशेष अभियंता, राज्य दिल्लीचे जयराज लोंडे, कोल्हापूरचे माजी महापौर राजू शिंगाडे, सी.ई.ओ. उद्योगपती, इजिप्त-मॅक्सिको, राष्ट्रचे एलिजाबेथ इस्लास लिऑन, माजी केंद्रीय मंत्री सौ रत्नमाला सावनूर, जिल्हा कमांडंट, होमगार्ड डिपार्टमेंट चे अरविंद घट्टी, जिल्हा पोलिस प्रमुख, (अतिरिक्त) एस.पी. बिदर महेश श्रेघण्णावर यांच्या उपस्थित हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. संतोष पुजारी यांना राष्ट्रीय पातळीवर या पुरस्कराने सन्मान करण्यात आल्याने त्यांचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.