उत्तर प्रदेशात मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न, रुग्णालयात उपचार सुरु

0
308

उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे मंगळवारी सकाळी एका महिलेने मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी घडली.

उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे एका महिलेने मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जनता दरबारातून बाहेर पडल्यानंतर, गौतमपल्ली पोलिस स्टेशन हद्दीतील विक्रमादित्य मार्गावरील 19 बीडी चौकात महिलेने पेट्रोल टाकून स्वत: ला पेटवून घेतले आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.

अधिक माहितीनुसार, महिला उन्नाव येथील रहिवासी आहे. कौटुंबिक वादाला कंटाळून महिलेने टोकाचे पाऊल उचलेले. घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी पेटलेल्या महिलेला वाचवण्यासाठी ब्लॅंकेटचा वापर केला. महिला गंभीररित्या भाजलेली होती. पोलिसांनी तीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीची प्रकृती गंभीर असून सद्या तिच्यावर उपचार सुरु आहे. पोलिसांनी या प्रकरणी पीडित महिलेच्या कुटुंबाशी चौकशी सुरु केली आहे.

महिलेचे गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरु होता. महिला कौटुंबिक वादामुळे त्रस्त झाली होती. महिलेने स्थानिक पोलिस ठाण्यात देखील तक्रार केली होती. परंतु तिथे तीच्या समस्येचे निराकरण होऊ शकले नाही. तेव्हा तिने मंगळवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जनता दरबारात तक्रार मांडली. परंतु तिथे देखील कोणताही तोडगा निघाला नाही. वैतागून महिलेने आत्मदनाचा प्रयत्न केला. विरोधी पक्ष नेते समाजवादी पक्ष यांनी योगी आदित्यनाथ यांना या घटनेसाठी जबाबदार ठरवले आहे.

पहा व्हिडीओ:

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here