अंबानी-अदांनीना मोठा तोटा! संपत्तीत 86 हजार कोटी रुपयांची घट, ‘या’ उद्योगपतींचीही नावे लिस्टमध्ये

0
240

जगातील अव्वल 15 अब्जाधीशांपैकी 6 अब्जाधीशांच्या संपत्तीत 6 अब्ज डॉलर्सहून अधिक घट  झालीय. यामध्ये भारतातील बडे उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी  यांच्या संपत्तीत देखील मोठी घट झालीय. या दोघांच्या संपत्तीत 86 हजार कोटी रुपयांहून अधिक घट झाली आहे. आशियाई अब्जाधीशांमध्ये सर्वात मोठा तोटा गौतम अदानी यांच्या संपत्तीत झाला आहे.

सोमवारी भारतीय शेअर बाजारात आणि त्यानंतर अमेरिकन शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. त्यामुळं जगातील सर्वात मोठ्या अब्जाधीशांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे. विशेष बाब म्हणजे जगातील टॉप 15 अब्जाधीशांपैकी 6 अब्जाधीशांच्या संपत्तीत 6 अब्ज डॉलर्स किंवा त्याहून अधिकची घट झाली आहे. अंबानी आणि अदानींच्या संपत्तीत 86 हजार कोटी रुपयांहून अधिकची घट झाली आहे. आशियाई अब्जाधीशांमध्ये सर्वाधिक नुकसान गौतम अदानी यांच्या संपत्तीत झाले आहे. संपूर्ण जगात सर्वात मोठा तोटा जेफ बेझोस यांच्या संपत्तीमध्ये दिसून आला.

गौतम अदानींच्या संपत्तीत 53 हजार कोटी रुपयांची घट
ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या आकडेवारीनुसार गौतम अदानी यांच्या संपत्तीत 6.31 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 53 हजार कोटी रुपयांची घट झाली आहे. त्यानंतर गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 104 अब्ज डॉलरवर आली आहे. विशेष बाब म्हणजे चालू वर्षात गौतम अदानी यांच्या संपत्तीत 19.3 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. दुसरीकडे, आशियातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत 33 हजार कोटी रुपयांची घट झाली आहे. त्यानंतर मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 109 अब्ज डॉलरवर आली आहे. चालू वर्षात मुकेश अंबानींच्या एकूण संपत्तीत 12.5 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे.

जगातील अब्जाधीशांच्या संपत्तीत मोठी घट
जगातील अव्वल अब्जाधीशांच्या संपत्तीत देखील मोठी घट झालीय. यामध्ये एलन मस्क यांच्या संपत्तीत 6.29 बिलियन डॉलरचे नुकसान झाले आहे, तर दुसरीकडे, जेफ बेझोसच्या संपत्तीत 6.66 बिलियन डॉलरची सर्वात मोठी घट झाली आहे. बर्नार्ड अरनाल्ट यांच्या लपत्ती 1.17 अब्ज डॉलरची, मार्क झुकेरबर्ग 4.36 अब्ज डॉलरची, बिल गेट्स 3.57 अब्ज डॉलरची , लॅरी पेज 6.29 अब्ज डॉलरची, लॅरी एलिसन 5.43 अब्ज डॉलरची, स्टीव्ह बाल्मर 4.33 अब्ज डॉलरची, सर्गे ब्रिन 5.89 अब्ज डॉलरची, वॉरन बफे 4.50 अब्ज डॉलरची, मायकेल डेल 2 अब्ज डॉलरची, बिल डेल 29 अब्ज डॉलरची घट झाली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here