चारित्र्य संशयावरून शिराळ्यात पत्नीचा खून

0
618

माणदेश एक्सप्रेस/सांगली : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा ओढणीने गळा आवळून पतीने खून केल्याचा प्रकार शिराळा तालुक्यातील मांगले गावी घडला. या प्रकारानंतर पतीने भावाच्या सांगण्यावरून समक्ष पोलीस ठाण्यात हजर होउन खूनाची कबुलीही दिली. सहा वर्षाच्या मुलाने ही हकीकत चुलत्याला सांगताच हा प्रकार समोर आला.

 

याबाबत माहिती अशी, मांगले वारणानगर रस्त्यावर भाड्याच्या घरात गेल्या १५ वर्षापासून वास्तव्य असलेल्या मंगेश चंद्रकांत कांबळे (वय ३२ रा. मांगले, मूळ राहणार कोकरूड) याने पत्नी प्राजक्ता (वय २७) हिचा चारित्र्यांचा संशय घेउन ओढणीने गळा आवळून खून केला. यानंतर मृतदेह शेजारच्या खोलीत असलेल्या लोखंडी पत्र्याच्या पेटीत ठेवून त्यावर पांघरूण घातले.

 

संशयित मुंबईमध्ये नोकरीस असून काही दिवसापुर्वीच आईकडे आला होता. मांगले येथे त्याची आई व भाउ राहतात. काल आई परगावी गेली होती. या दरम्यान, त्याचे आणि पत्नीचे कडाक्याचे भांडण झाले. या दरम्यान, त्याचा सहा वर्षाचा मुलगा शिवम व तीन वर्षाची मुलगी शिवन्या होती. भांडणात त्याने पत्नीचा गळा ओढणीने आवळून खूनू करून प्रेत पत्र्याच्या पेटीत ठेवले. आणि भावाला फोनवर मी कामासाठी बाहेर जात असल्याचे सांगितले.

 

घटनेनंतर काही वेळाने भाउ घरी आला असता सहा वर्षाच्या शिवमने मम्मीचे आणि पप्पाचे भांडण होउन मम्मीला खलास केले असल्याचे सांगितले. भावाने फोन केला असता पत्नी रूसून गेल्याचे सांगून तिच्या शोधात आपण जात असल्याचे संशयितांने सांगितले. शिराळ्यातील गोरक्षनाथ मंदिराजवळ त्याला थांबण्यास सांगून तात्काळ त्याठिकाणी जाउन या प्रकरणाचा आपणास त्रास व्हायला नको तू तात्काळ पोलीस ठाण्यात जाउन कबुली दे असे सांगताच संशयितांने पोलीस ठाण्यात हजर होउन खूनाची कबुली देत मृतदेह पेटीत लपवून ठेवल्याचे सांगितले. पोलीसांनी त्याला अटक करून गुन्हा दाखल केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here