
माणदेश एक्सप्रेस/तुळजापूर : तुळजा भवानी देवीच्या चरणी लाखो लोक दर्शनाला येत असतात. तुळजाभवानी महाराष्ट्राची कुलदेवी आहे. महाराष्ट्राबरोबरच दक्षिणेकडील भक्तदेखील देवीच्या दर्शनासाठी तुळजापूरला येत असतात. भक्त देवीच्या चरणी भरभरून दान करत असतात. देवीच्या चरणी एका अज्ञात भक्ताने तब्बल 1 कोटी रुपयांचे दान अर्पण केले आहे. तुळजाभवानीला १ किलो सोन्याच्या ११ बिस्किटांचे गुप्तदान करण्यात आले असून प्रत्येक बिस्किट 100 ग्रॅमचे आहे. मंदिरातील दानपेट्या उघडल्यावर हा प्रकार उघडकीस आला आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी देवीच्या दानपेटीत एका अज्ञात भाविकाने १ किलो १०० ग्रॅम वजनाची २४ कॅरेट सोन्याची ११ बिस्किटे अर्पण केली आहेत. प्रत्येक बिस्किटाचे वजन १०० ग्रॅम आहे. शुक्रवारी सकाळी दानपेट्या उघडण्यात आल्या तेव्हा भाविकाने अर्पण केलेले सोन्याचे बिस्किट चोपदार दरवाजातील सिंहासन पेटी क्र.२ मध्ये आढळून आली. प्रत्येक बिस्किटावर १०० ग्रॅम तसेच ९९९ लिहिले आहे. शुक्रवारी सोन्याचा प्रतितोळा दर ९२ हजार रुपये होता. त्यानुसार या ११ बिस्किटाची किंमत सुमारे १ कोटी १ लाख २० हजार रुपये होते.
मंदिरातील सर्व सिंहासन पेट्या व दानपेट्यांची सोमवार, बुधवार व शुक्रवार अशी आठवड्यातून ३ वेळा धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत व सीसीटीव्हीच्या निगराणीत मोजणी केली जाते. यासाठी मंदिर कर्मचाऱ्यांची तीन पथके आहेत. दरम्यान मंदिर संस्थांना याबाबत संपर्क केला असता भाविक गुप्तदान पद्धतीने दानपेटीत दान टाकत असतात. त्यामुळे हे दान कोणी टाकले याची माहिती आम्ही घेतली असून ती गुप्त ठेवण्यात येणार असल्याचं मंदिर संस्थांनाने सांगितलं आहे.
तुळजाभवानीच्या मुख्य गाभाऱ्यासह शिखराची पुनर्बांधणी होणार आहे. देवीच्या मुख्य मंदिराची नव्याने बांधणी होत असून पुरातत्त्व विभागाच्या स्ट्रक्चरल रिपोर्टनंतर बदलण्यात आला निर्णय. सुमारे दीडशे वर्षानंतर तुळजाभवानीच्या मुख्य गाभारा आणि शिखराचे नव्याने निर्माण होत आहे. श्री तुळजाभवानीची मूर्ती इतर ठिकाणी हलवून करण्यात येणार मुख्य शिखराचे काम. मुख्य मंदिर सोडून दोन वर्ष देवीची मूर्ती राहणार दुसऱ्या ठिकाणी राहणार आहे.