का सोडल ‘बिग बॉस मराठी 5’? महेश मांजरेकरांनी सांगितलं खर कारण

0
7

‘बिग बॉस मराठी 5’चा नवीन प्रोमो पाहताच नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या. महेश मांजरेकर नाहीत, हे जाणून काहींनी नाराजीसुद्धा व्यक्त केली. ‘बिग बॉस’ हा शो मराठीत सुरू झाल्यापासून निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनीच या शोचं सूत्रसंचालन केलं होतं.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत महेश मांजरेकर यांनी शोमधून बाहेर पडण्यामागचं कारण सांगितलं. ते म्हणाले, “मी सध्या मणिरत्नम यांच्या चित्रपटात व्यस्त आहे. याशिवाय एका कन्नड चित्रपटाचंही काम सुरू आहे. शूटिंगसाठी मला सतत दिल्ली, लंडन, बँकॉक याठिकाणी जावं लागतंय.”

“पुढील दोन ते तीन महिने मी या प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र असणार आहे. माझ्या मनातही काही कल्पना आहेत. त्यामुळे हे शूटिंग संपल्यानंतर त्यावर मी काम करणार आहे. म्हणूनच मी सध्या बिग बॉससाठी वेळ देऊ शकलो नाही”, असं मांजरेकरांनी स्पष्ट केलं.
हिंदीत सलमानला जितकी लोकप्रियता मिळाली, तितकीच मराठी महेश मांजरेकर यांना ‘बिग बॉस’चे सूत्रसंचालक म्हणून प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. त्यामुळे रितेश देशमुखसमोर प्रेक्षकांची मनं जिकण्याचं मोठं आव्हान असेल.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here