महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला काय? राज्यपाल नियुक्त 12 जागांचं वाटप कसं होणार? वाचा सविस्तर बातमी..

0
298

 

राज्यपाल नियुक्त 12 जागा मागच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून रिक्त आहे. अशातच आता या 12 जागांवर नियुक्ती केली जाण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. आधी समसमान वाटप होणार होतं. 4- 4- 4 चा फॉर्मुला ठरला होता. मात्र आता भाजपाला 6 शिवसेनेला 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 3 असा फॉर्मुला ठरला असल्याची माहिती मिळते आहे, असं शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणालेत. चंद्रकांत रघुवंशी हे विधान परिषदेवर जाण्यासाठी इच्छुक आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पूर्ण विश्वास आहे ते मला न्याय देतील, अशी मला अपेक्षा आहे, असं चंद्रकांत रघुवंशी म्हणालेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here