राज्यात चाललय तरी काय ; अजित पवार गटाच्या सरपंचाची गोळ्या घालून हत्या

0
24

माणदेश एक्सप्रेस न्युज : परळी : बीड जिल्ह्यातील परळीमधील सरपंच बापू आंधळे यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. बापू आंधळे यांच्या हत्येमागेचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. बबन गीते यांच्या पॅनलमधून बापू आंधळे यांनी सरपंचकीची निवडणूक लढवली होती. परळीमधील बँक कॉलनी परिसरात हा गोळीबार झाला आहे.

शरद पवार गटाचे नेते बबन गीते यांच्या पॅनलमधून बापू आंधळे मरळवाडी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. बापू आंधळे यांच्यावर हल्लेखोरांनी पाच फायर राऊंड केले. या गोळीबारामध्ये सरपंच बापू आंधळेंचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परळी तालुका हादरला असून घटनास्थळावर पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून, पंचनामा केला असून, हा गोळीबार कोणी केला? आणी हत्येमागचं कारण काय याबाबतची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here