
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी साई मंदिर चौक ते पोलीस ठाणे या सुरु असणाऱ्या रस्ते कामामध्ये अनेक ठिकाणी अतिक्रमण आहेत. यामध्ये सुहास दौंडे यांचे घराचे बांधकाम हे अतिक्रमणमध्ये येत असून, त्यावर कारवाई न करता त्या ठिकाणी असणारे नाथबाबाचे मंदिर अतिक्रमण आहे म्हणून काढायचे हा कोणता धंदा? असा सवाल भाजपचे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल पाटील यांनी केला. काम सुरु असलेल्या ठिकाणी त्यांनी भेट देत अधिकाऱ्यांना जाब विचारला.
आटपाडी येथे नगरविकास विभागाच्या वतीने वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत साई मंदिर चौक ते बाजार पटांगण मार्गे पोलीस ठाणे असा रस्ता मंजूर झाला आहे. या रस्ते कामास सुरुवात झाली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारचे काम चालू आहे. या ठिकाणी रस्त्याचे काम करत असताना ठेकेदाराने, अतिक्रमणामध्ये असणारी घरे न काढता, त्या ठिकाणी असणारे नाथबाबाच्या मंदिराचा सभामंडपाचे अतिक्रमण आहे म्हणून काढले आहे.
नाथबाबाचे मंदिर अतिक्रमणात आहे म्हणून काढणारे प्रशासन मात्र, शेजारी असणारी घर अतिक्रमणमध्ये असून सुद्धा त्यावर राजकीय सूडबुद्धीने कारवाई केली जात नाही. त्यामुळे या अतिक्रमणाला राजकीय अंग असून प्रशासनाने कुणाच्या तरी ऐकून अतिक्रमण काढले नाही तर, आम्ही ते काढण्यास भागू पाडू असा इशारा देखील अनिल पाटील यांनी दिला.