सुप्रसिद्ध गायिका अलका याज्ञनिक ‘या’ दुर्मिळ अजाराने त्रस्त,ऐकू येणं झालं बंद

0
16

ज्येष्ठ गायिका अलका याज्ञनिक यांच्या आवाजामुळे 90 दीच्या शतकातील बॉलिवूडची अनेक गाणी गाजली. त्यानंतर अलका याज्ञनिक अनेकदा रिअॅयलिटी शो मध्ये परिक्षकाच्या भूमिकेत दिसल्या मात्र सध्या त्या कलाक्षेत्रापासून दूर असल्याचं कारण त्यांनीच जाहीर केले आहे.

वायरल अटॅक नंतर एक दिवस विमानातून उतरल्यानंतर अचानक त्यांना ऐकू येणं बंद झाल्याचं त्यांनी पोस्ट मध्ये लिहलं आहे. दरम्यान त्यांना Rare Sensory Neural Nerve Hearing Loss ने ग्रासलं असून औषधोपचार सुरू झाले असून रिकव्हरी होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी खूप जोरात आवाज आणि हेडफोन्स यांच्यापासून दूर राहण्याचे देखील आवाहन केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here