शिक्षक गिरीश फोंडे यांचे निलंबन रद्द करू; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे शिष्टमंडळाला आश्वासन

0
117

माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : शक्तीपीठ आंदोलनात सहभागी शिक्षक गिरीश फोंडे यांचे निलंबन रद्द करण्या संदर्भात कोल्हापूर मनपा आयुक्ताना पत्र देऊ तसेच शक्तिपीठ महामार्गबाबत चर्चा सुरु असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले.

 

गिरीश फोंडे यांचे निलंबन रद्द करा, शक्तिपीठ महामार्ग रद्द करा अन्यथा पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवू असा इशारा शक्तिपीठ विरोधी कृती समितीच्या वतीने देण्यात आला होता. त्याची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे व पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी मध्यस्थी करत चर्चा घडवून आणली. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बरोबर कृती समितीचे कॉ. उमेश देशमुख, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे, उमेश एडके, विष्णू पाटील यांनी पोलीस मुख्यालयात चर्चा करून निवेदन दिले.

 

यावेळी पालकमंत्री म्हणाले, गिरीश फोंडे हे कोल्हापूर महापालिकेत शिक्षक आहेत त्यांनी शक्तिपीठ विरोधी आंदोलनात सहभाग घेतल्याबद्दल निलंबन करण्यात आले आहे. या संदर्भात कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्ताना पत्र देऊन निलंबन रद्द करण्याबाबत शिफारस करू अशी ग्वाही दिली. तसेच शक्तिपीठ महामार्गबाबत शासन स्तरावर चर्चा सुरु असल्याचे सांगितले.

 

बेदाण्याचा शालेय पोषण आहाराबाबत शासन निर्णय होऊन देखील त्याचा शालेय पोषण आहारात समावेश झालेला नाही त्या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर यात लक्ष्य घालून हा प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही दिली. देवस्थान इनाम जमिनीच्या प्रश्नाबाबत चर्चा करताना ते म्हणाले हा राज्य व्यापी प्रश्न हा प्रश्न निकालात काढण्यासाठी लवकरच राज्याची बैठक घेऊ असे सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, आयुक्त रविकांत अडसूळ आदी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here