
आटपाडीचे तहसीलदार सागर ढवळे यांचा विधायक उपक्रम
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील महसूलचे अधिकारी भेटत नसल्याने सामान्य लोकांची अनेक किरकोळ कामांना विलंब होत असल्याने, थेट क्यूआर कोड स्कॅन करा, थेट अधिकाऱ्यांशी संपर्क साधा, असा विधायक उपक्रम आटपाडीचे तहसीलदार सागर ढवळे यांनी सुरु केला असून, त्यांच्या याउपक्रमाचे कौतुक होत आहे.
आटपाडीचे तहसीलदार सागर ढवळे यांनी मुख्यमंत्री 100 दिवस कृती कार्यक्रम नागरी सेवाचे सुलभीरण अंतर्गत हा विधायक उपक्रम सुरु केल्याने लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. महसूल विभागाचा कणा असणारे तलाठी म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी आणि लोकांची बहुतांश वेळा भेट होत नाही. ग्राम महसूल अधिकारी यांना दोन तीन गावांचा कारभार बघावा लागतो. महसूल विभागाची बैठक आणि नियमित कामकाजात ही मंडळी अनेकवेळा व्यक्त असल्याने नागरिकांना अनेकवेळा किरकोळ कामासाठी हेलपाटे मारावे असल्याने अनेव वेळा तक्रारी देखील होत असतात.
त्यामुळे तहसीलदार सागर ढवळे यांनी आपल्या कार्यालयात त्यांचा स्वतःचा आणि तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी,ग्राम महसूल अधिकारी यांच्या व्हाट्सअप क्यू आर कोड असलेला फलक लावला आहे. सध्या सर्वच लोकांच्याकडे स्मार्ट फोन आहेत. त्यामुळे हा क्यू आर कोड वापरून त्यांना संपर्क करता येणार आहे.
तहसीलदारांच्या या उपक्रमामुळे नागरिकांचा त्रास कमी होणार असून, जरी तालुक्याच्या ठिकाणी नागरिक आले तरी, त्यांना आता येथून पुढच्या काळात थेट संपर्क होणार असल्याने नागरिकांची वेळ वाचणार असून त्रास देखील कमी होणार आहे.