विशाल पाटलांनी सांगलीच्या विजय मिरवणुकीत नाचवले वाघ!

0
6

सांगलीत विशाल पाटलांनी मैदान मारलं, त्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.कार्यकर्त्यांनी भव्य मिरवणुकीत वाघाचे सॉफ्ट टॉय नाचवल्याचं पाहायला मिळालं.महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपावरुन जोरदार चुरस पाहायला मिळाली.
सांगलीतून अपक्ष निवडणूक लढवलेल्या विशाल पाटलांची सांगलीत रात्री भव्य विजयी मिरवणूक निघाली.विश्वजीत कदम-विशाल पाटील गुलालात न्हाहून निघाले आहेत.पण या विजयी रॅलीत चर्चा होती ती, विजय रॅली दरम्यान विश्वजित-विशाल यांच्या समोर दाखवलेल्या वाघाच्या सॉफ्ट टॉयची.निवडणूक प्रचारादरम्यान आम्ही सांगलीचे वाघ आहोत, असं वक्तव्य आमदार विश्वजित कदम यांनी केलं होतं.या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी रॅलीच्या गाडीवर वाघांचे सॉफ्ट टॉय ठेवले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here