ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारण

“मला पराभूत करण्यासाठी सर्वच एकत्र आले,आज तुमची वेळ आहे ,उद्या माझी येईल” पहा चंद्रहार पाटील नेमक काय म्हणाले

सांगली लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. या मतदारसंघातील लढत ही अत्यंत तुल्यबळ मानली जात होती. या मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील मैदानात होते. तर महायुतीकडून भाजपचे संजयकाका पाटील निवडणूकीच्या मैदानात होते. तर महाविकास आघाडीनं तिकीट नाकारल्यानंतर विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. यामध्ये विशाल पाटलांनी मोठ्या मतांनी विजय मिळवला आहे. यानंतर चंद्रहार पाटील यांनी एक पोस्ट शेअर केलीय. या पोस्टची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

नेमकं काय म्हणाले चंद्रहार पाटील?
“या निवडणुकीत कुणाला दिलदार शत्रू मिळाले, तर कुणाला दिलदार मित्र मिळाले, पण माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या पोराला पराभूत करण्यासाठी सर्वच सहकारी मित्र, एकत्र आले आणि शत्रू म्हणून समोर उभे राहिले. पण वेळ प्रत्येकाची येते, आज तुमची आहे, उद्या माझी येईल” अशा आशयाची पोस्ट चंद्रहार पाटील यांनी शेअर केलीय. या पोस्टची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या पोस्टमधून चंद्रहार पाटील यांचा नेमका रोख कुणावर? अशी सांगलीच्या राजकारणात चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, या सांगली लोकसभेच्या निवडणुकीत चंद्रहार पाटील यांचे डिपॉझिट जप्त झाले असून, त्यांना केवळ 60 हजार 860 इतकी मते मिळाली आहेत.

सांगली लोकसभेसा मतदारसंघातील लढत यावेळी लक्षवेधी झाली. सर्व दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा या मतदारसंघात पणाला लागली होती. सांगली लोकसभेसाठी यावेळी जवळपास 61 टक्के मतदान झालं होतं. त्यामध्ये खरी लढत ही अपक्ष विशाल पाटील आणि भाजपचे संजयकाका पाटील यांच्यात झाली. विविध एक्झिट पोलमध्येही विशाल पाटील हेच आघाडीवर असल्याचं सांगितलं गेलं. जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी चंद्रहार पाटलांना मदत न करता अपक्ष असलेल्या विशाल पाटलांना मदत केल्याचं उघड झालं आहे. खासकरून आमदार विश्वजीत कदम जरी महाविकास आघाडीच्या स्टेजवर दिसले तरी त्यांचा कल हा कुणाकडे होता हे उघड झाले. विश्वजीत कदमांची सर्व यंत्रणा ही विशाल पाटलांच्या मागे उभी राहिली आणि परिणामी विशाल पाटील यांचे पारडे जड झाले. त्यामुळं विशाल पाटील हे चांगल्या मताधिक्यानं निवडूण आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button