ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कधी ट्राय केलाय का ‘मिक्स डाळ सुशी ढोकळा रोल्स’,खायलाही एकदम चविष्ट ;अन सगळे होतील खुश

रोज तेच-तेच खाऊन कंटाळा आला असेल तर मग आज काहीतरी नवीन बनवण्याचा प्रयत्न करा.ही रेसिपी सर्वांना
नक्की आवडेल .

घटक
• 1 कप मिश्र डाळींच् फरमेन्ट केलेलं पीठ
• मिक्स डाळ मिनी उत्तप्पा
• चवीनुसार मीठ
• 1 टीस्पून आलं, लसूण मिरची पेस्ट
• गाजर, सिमला मिरची यांचे जुलियन कापून
• 1 टीस्पून काळे आणि पांढरे तीळ
• चटणी करता
• 1/4 कप खवलेला ओला नारळ
• 2 हिरव्या मिरच्या
• 5-6 लसूण पाकळ्या
• 1 इंच आलं
• 1 टेबलस्पून शेंगदाणा कुट
• चवीनुसार मीठ आणि साखर

 कुकिंग सूचना

1

फेरमेन्ट केलेलं मिश्र डाळीचं बॅटर एका बाउल मध्ये काढून घ्या,त्यात मिरची,आलं, लसूण पेस्ट आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्या (मिक्स डाळ उत्तप्पा बनवताना वापरलेले बॅटर मी इथे वापरले आहे,मिश्र डाळींच्या बॅटर ची रेसिपी लिंक जोडत आहे)
मिक्स डाळ सुशी ढोकळा रोल्स (mix dal sushi dhokla rolls recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
2
आता ढोकळा पात्राला बटर पेपर लावून घ्या
आणि त्यावर तयार मिश्र डाळीचं बॅटर पसरवून घ्या, (बटर पेपर लावल्याने ढोकळा1 अगदी सहज डीमोल्ड होईल)
त्या वर बॅटर चा अगदी पातळ लेयर पसरवून घ्या, जेणेकरून आपला रोल पुढे जाऊन नीट गुंडाळला जाईल
3
ढोकळा पात्र नेहमीप्रमाणे वाफेत 7-8 मिनीट वाफवून घ्या
4
ढोकळा वाफवून होईस्तोवर आपण चटणी बनवूया…
चटणीसाठी घेतलेले जिन्नस मिक्सरमध्ये फिरवून फाईन पेस्ट करून घ्या, आणि बाजूला ठेवा
आता पुढील प्रोसेस ढोकळा थोडा गरम असतानाच करायची आहे
5
क्लिंग रॅप वर सफेद आणि काळे तीळ पसरवून घ्या
6
तयार ढोकळा चौकोनी कापून घ्या, आणि तिळ पेरलेल्या क्लिंग रॅप वर ठेवा त्यावर तयार चटणी पसरवून घ्या,वर गाजर आणि सिमला मिरची चे जुलीयन ठेवा,वरून थोडा चाट मसाला भुरभुरून घ्या, चाट मसाला ऑपशनल आहे
7
क्लिंग शीट हळूहळू रोल करत, आणि सुशी रोल गुंडाळत जा.. आणि अर्धा तास रॅप करून ठेवा, म्हणजे रोल चा व्यवस्थित शेप येईल
8
आता तयार रोल कापून घ्या आणि बस खायला तयार आहे, एकदम इनोव्हेटिव्ह आणि पौष्टिक असा
“मिक्स डाळ सुशी ढोकळा रोल्स”
चॉप स्टिक सोबत खाताना तर खरोखर सुशी खाल्ल्याचा फील येईल…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button