जर तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर आता अजिबात टेन्शन घेऊ नका. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच मोठी संधी आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करावीत. एकप्रकारची मोठी संधी तुमच्याकडे आहे. विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच या भरती प्रक्रियेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलीये. कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. इंजिनिअरिंगमध्ये तुमचे शिक्षण झालेले असावे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक.
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून विविध पदांसाठी ही भरती राबवली जातंय. ही एकप्रकारची मेगा भरतीच म्हणावी लागणार आहे. 435 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेतून इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर सायन्स आणि सिव्हिलची पदे भरली जातील.
या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. 4 जुलै 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे आणि त्यापूर्वीच अर्ज करावी लागतील. B.E., B.Tech, B.Sc मध्ये पदवी घेतलेले उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. यासोबत वयाचीही अट भरतीसाठी लागू करण्यात आलीये.
18 ते 28 वयोगटापर्यंतचे उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये थोडी सूट देण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 500 रूपये फीस ही भरावी लागेल. यामध्ये प्रवर्गातील विद्यार्थ्यांना फीस भरण्याचे टेन्शन नसणार आहे. https://careers.powergrid.in/recruitment-nextgen येथे जाऊन अर्ज भरावी लागतील.
नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतात कुठेही असू शकते. http://www.powergrid.in या साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. 40 हजार रुपये ते 1 लाख 40 हजार रुपयांपर्यंत निवड झालेल्या उमेदवारांना पगार मिळणार आहे. मग उशीर न करता भरती प्रक्रियेसाठी इच्छुकांनी अर्ज करावीत, ही मोठी संधी नक्कीच आहे.