पुण्यात अज्ञात वाहनाने दोन पोलिसांना चिरडले

0
68

 

पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर हिट अँड रनचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर बापोडीजवळ अज्ञात वाहनाने दोन पोलिसांना चिरडले. या अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समाधान कोळी असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पी.सी.शिंदे असे जखमीचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. रविवारी मध्यरात्री साधन कोळी आणि शिंदे हे बीट मार्शल म्हणून गस्त घालत होते. यावेळी त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली.

यात साधन कोळी यांचा जागीच मृत्यू झाला
हा अपघात इतका भीषण होता की समाधान कोळी याचा जागीच मृत्यू झाला. तर शिंदे हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक लोकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी पोलीस शिपाई शिंदे यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. साधन कोळी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे
शहरात हिट अँड रनच्या घटना वाढल्यानंतर नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या घटनेने पोलिसांनाही धक्का बसला आहे. या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे व सुरक्षितता ठेवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here