राशिभविष्यताज्या बातम्यामहाराष्ट्र

आजचे राशी भविष्य: हात लावाल तिथे सोनं असा ‘या’ राशीचा आजचा दिवस; पहा तुमची राशी काय सांगते …

मेष: कला आणि कौशल्याच्या क्षेत्रात तुम्हाला आजचा दिवस चांगला असेल. तुमच्या सुख आणि संपत्ती वाढ होईल. बराच काळ अडकून राहिलेली डील आज पूर्ण होईल. तुमच्या मनमानी व्यवहारामुळे काही अडचणी येतील. एखाद्या गोष्टीवर जास्त बोलू नका. त्याचा तुमच्या कामावर परिणाम होईल. कुटुंबात ज्याच्यावर एखादी जबाबदारी द्याल तो तुमचं काम पूर्ण करेल. राजकारणातील लोकांना दिवस चांगला आहे. एकादं मोठं पद मिळण्याची शक्यता आहे.

वृषभ: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत चांगला ठरणार आहे. तुमच्या व्यवसायात कमाई करण्यावर भर द्यावा लागेल. कुणालाही पैसे उधार देऊ नका. आईकडून आज तुम्हाला मोठी भेट मिळू शकते. कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून चांगली वार्ता ऐकायला मिळेल. त्यामुळे घरातील वातावरण अत्यंत चांगलं राहील. विदेशात जाऊन शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांना आज अर्ज करण्यासाठीचा चांगला दिवस आहे. कुटुंबातील सदस्यांना घेऊन पिकनिकला जाण्याचा बेत कराल. आरोग्याच्या बाबतीत तक्रारी उद्भवतील. डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्या.

मिथुन: आजच्या दिवशी तुम्हाला मोठं यश मिळणार आहे. एखाद्या मालमत्तेत गुंतवणूक करणं तुमच्यासाठी चांगलं राहील. कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीने चांगलं स्थान मिळवाल. व्यवसायात तुम्हाला जुन्या योजनांमुळे लाभ मिळेल. तुमच्या यशाचे नवनवीन मार्ग उघडे होतील. पण तुम्ही एका कामामुळे त्रस्त असाल. त्यासाठी तुम्हाला प्रवासही करावा लागणार आहे. अनेक वर्षानंतर एका जुन्या मित्राची भेट होईल. विद्यार्थ्यांनी शिक्षणावर फोकस केला पाहिजे. तरच त्यांना परीक्षेत यश मिळेल.

कर्क: नोकरीत कार्यरत असणाऱ्यांना आजचा दिवस अत्यंत चांगला जाईल. शेअर मार्केटशी संबंधितांना आज मोठं काम मिळेल. तुम्हाला एखादा नवा प्रोजेक्ट मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तुमचं उत्पन्न वाढणार असून हा आनंद तुमच्यासाठी खास असेल. नोकरीत कार्यरत असणाऱ्या लोकांना अधिकाऱ्यांच्या म्हणण्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे. नाही तर त्या कामात गडबड होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करत असाल तर सढळ हाताने गुंतवणूक करा. तुम्ही तुमच्या भविष्यासाठी काही खास योजना आखण्याची चिन्हे आहेत. आळशी स्वभावामुळे कामं रेंगाळण्याची चिन्हे आहेत.

सिंह: आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य राहील. एखाद्याला वचन देण्यापूर्वी तुम्हाला विचार करावा लागेल. भावूक होऊन निर्णय घेऊ नका. तुमच्या मित्रांसोबत काही वेळ गप्पागोष्टी करण्यात घालवाल. तुमच्या घरी आज एखाद्या पाहुण्याचं आगमन होईल. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांची प्रतिष्ठा वाढेल. तुम्हाला एखाद्या समस्येचा सामना करावा लागेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याकडे मदत मागितली तर ती सहज मिळेल. खाण्यापिण्याची पथ्य पाळा.

कन्या: आजचा दिवस तुम्ही समस्यांशी झुंजणार आहात. तुमचा एखादा चुकीचा निर्णय तुम्हाला त्रासदायक ठरू शकतो. कारण तुम्ही काही कामांमध्ये तुमची मनमानी चालवाल. त्यामुळे तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कुटुंबात तुम्हाला ताळमेळ साधावा लागणार आहे. तुमच्या वैयक्तिक प्रकरणात बाहेरच्या लोकांचा सल्ला घेऊ नका. एखादं कोर्टकचेरीचं प्रकरण असेल तर ते मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. पण त्यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनत आणि धावपळ करावी लागण्याची शक्यता आहे. जीवनसाथीला घेऊ शॉपिंगला जाल.

तुळ: करिअरमुळे सतत टेन्शनमध्ये असणाऱ्यांना आजच्या दिवशी आनंदाची बातमी मिळणार आहे. व्यवसायातील छोटीमोठी संधी सोडू नका. वेळेचा सदुपयोग करा. व्यवसायात पुढे जाण्याची संधी मिळेल. तुम्ही खूपच प्रवास करता. ते टाळा. कोणत्याही विचित्र टास्कमध्ये भाग घेऊ नका. कुटुंब आणि जीवनसाथीसाठी वेळ काढा. एखाद्या धार्मिक कार्यात भाग घेण्याची संधी मिळेल. सामाजिक क्षेत्रात मानसन्मान मिळेल.

वृश्चिक: खर्च वाढण्यापासून सावध राहण्याचा आजचा दिवस आहे. आज जर तुम्ही खर्चावर नियंत्रण नाही ठेवलं तर त्याचा तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होईल. निर्णय घेण्याच्या क्षमतेमुळे तुम्हाला त्याचा लाभ होईल. निर्णय घेताना विचार करा. कुटुंबात मोठ्या व्यक्तींमध्ये एखाद्या विषयावर वाद असेल तर तो सोडवून घरात शांतता निर्माण करा. तुमच्या आजूबाजूच्या शत्रूंकडेही लक्ष द्या. एखाद्या समस्येमुळे तुम्ही तुमच्या मुलांना नाराज करू शकता. आईने दिलेली जबाबदारी पूर्ण करा.

धनु: आजच्या दिवशी आर्थिक व्यवहार करू नका. तुम्ही नव्या नोकरीत व्यस्त राहाल. पण तुम्हाला जुन्या नोकरीतही लक्ष घालावं लागेल. तुम्हाला तुमच्या खर्चाच्याबाबत सावध राहावं लागेल. बऱ्याच काळापासून अंगदुखी असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कुटुंबातील वाद बाहेरच्या लोकांसमोर आणू नका. नोकरी धंद्याच्या ठिकाणी तुमच्याकडून चुका होऊ शकतात. आज तुम्ही स्वादिष्ट जेवणाचा आनंद घेऊ शकाल.

मकर: आज तुम्हाला अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. त्यामुळे तुम्ही दिवसभर व्यस्त असाल. गेल्या अनेक वर्षापासूनची अर्धवट इच्छा पूर्ण होईल. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवाल. मौज, मस्ती कराल. कुटुंबातील समस्या सोडवाल. नोकरीचा शोध घेणाऱ्यांना चांगली संधी मिळेल. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात संधीच संधी मिळेल. नवा प्रकल्प सुरू कराल. हात लावाल तिथे सोनं असा तुमचा आजचा दिवस असणार आहे.

कुंभ: आज धंदापाणी चांगला राहील. पण कुणाचा सल्ला घेण्यापूर्वी सावध राहा. सल्ला घेतला असला तरी दहावेळा विचार करून त्याचा अंमल करा. मुलांच्या यशात येणारे अडथळे दूर होतील. कोणत्याही विपरीत परिस्थितीत संयम ठेवा. उत्पन्नाच्या स्त्रोतांवर लक्ष ठेवा. प्रेयसीकडून नकार येऊ शकतो. त्यामुळे वैतागू नका. शांत राहा आणि परिस्थिती स्वीकारा. आज चिडचिड कराल. त्यामुळे अस्वस्थ वाटू लागेल. आरोग्याची तक्रार उद्भवेल. एखाद्या किरकोळ गोष्टीवरून मित्र रागावेल.

मीन: यश काय असतं आणि कसं मिळतं? हे तुम्हाला आज जाणवेल. तुम्ही आज यशाची प्रत्येक पायरी चढाल. तुमच्या आयुष्यात काही आव्हानं येतील, त्यावर तुम्ही यशस्वीपणे नियंत्रण ठेवाल. पिकनिक जाण्याचा बेत आखू शकता. तुमच्या प्रिय व्यक्तीचं तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. कुटुंबातूनही भरघोस मदत आणि पाठिंबा मिळेल. खाण्यापिण्याचे पथ्य पाळा. लेटनाईट पार्ट्या टाळा. पुस्तकं विकत घेण्यावर कल असेल. एखाद्या विषयावर तास न् तास वाद घालाल.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button