आजचे राशीभविष्य : ‘या’ राशीला भाग्याची साथ चांगली मिळाल्यामुळे नवीन कामांना उजाळा मिळेल…तुमची तर नाही ना ही रास?

0
10

मेष :नोकरी व्यवसायात गुप्त शत्रूंना तोंड द्यावे लागेल. महिला स्वतःच्या मनाप्रमाणे वागतील.

वृषभ :प्रेम प्रकरणांमध्ये प्रेमीजन काही धाडसी योजना आखतील परंतु शिस्त आणि कर्तव्याच्या चौकटीत राहून त्यांना सर्व निर्णय घ्यावे लागतील.

मिथुन :आज भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल सौख्याचे आणि आनंदाचे क्षण तुम्हाला शोधत येतील आणि सुखद धक्के बसतील.

कर्क :भाग्याची साथ चांगली मिळाल्यामुळे नवीन कामांना उजाळा मिळेल परंतु कष्ट साध्य यश मिळणार आहे हे नक्की.

सिंह :अचानक नोकरीत बदल कामातही बदल संभवतो. संतती बाबत एखादी अचानक बातमी कानावर येऊन अचंबित व्हाल.

कन्या :आपले कर्तव्य खूप चांगले कराल त्यामुळे मिळणाऱ्या यशाला तोड नसेल. महिलांना मुलांसाठी जास्त वेळ द्यावा लागेल.

तुळ :जोडीदाराच्या लहरी आणि विक्षिप्त स्वभावाला तोंड द्यावे लागल्यामुळे वैवाहिक जीवनात वाढ होण्याची शक्यता.

वृश्चिक :घरामध्ये एकमेकांच्या गुणांचा परामर्श घेऊन सामंजस्य ठेवावे लागेल. कलाकारांना आपली कला समाजापुढे दाखवण्याची संधी मिळेल.

धनु :बरोबर काम करणारे सहकारी तुमच्याकडून वाजवीपेक्षा जास्त अपेक्षा ठेवतील. अशावेळी साधक-बाधक विचार करून सर्वांची मने राखावी लागतील.

मकर :आज तुमच्या मनाला थोडा आवर घालावा लागेल. कुटुंबातही समाजात लोक मान देतील.

कुंभ :तुमच्या कर्माला बुद्धीची ताकद मिळेल आणि कामे लवकर पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत व्यवहाराला जास्त महत्त्व द्याल.

मीन :विमा एजंट फायनान्स क्षेत्रात काम करणाऱ्यांना फायदेशीर दिवस आहे. महिला व विद्यार्थ्यांना संयम पाळण्याचे फळ मिळेल.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here