आजचे राशी भविष्य 8 June 2024 : “या” राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस असणार खर्चिक ; कुणाच्या राशीत काय?; जाणून घ्या आजचं भविष्य

0
16

मेष : आज तुमच्या कार्यक्षेत्रात काही बदल होणार आहे. विशेष म्हणजे हे बदल तुमच्या पथ्यावर पडणारे आहेत. त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे. तुम्हाला इतरांना मदत केल्याने आनंद मिळतो. इतरांना मदत करणं हा तुमचा स्वभाव आहे. त्यामुळे तुमचा आजचा दिवस इतरांना मदत करण्यात जाईल. तुमच्या चांगल्या स्वभावामुळे तुम्ही सर्व काही मिळवाल. रात्रीच्यावेळी तुम्हाला अचानक काही समस्यांचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे जपून राहा.

वृषभ : आरोग्याशी संबंधित तक्रारी उद्भवतील. त्याने त्रास होईल. कुटुंबातील सदस्यांसाठी तुम्ही काही योजना आखाल. संपत्तीचं प्रकरण असेल तर सावध राहा. नाही तर तुमची फसवणूक होऊ शकते. कुटुंबात एखादा सदस्य विवाह योग्य असेल तर त्याच्या लग्नाचं जुळून येईल. त्याला एक उत्तम जीवनसाथी मिळेल. तुमचं कायदेशीर प्रकरणही मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.

मिथुन : वडिलांचे आशीर्वाद आणि उच्चाधिकाऱ्यांची कृपा होईल. एखादी गोष्ट मिळवण्याची आकांक्षा पूर्ण होईल. पैसा आणि वेळ वायफळ घालवू नका. संध्याकाळी महत्त्वाच्या कामासाठी प्रवासाचा योग आहे. वाहनांपासून थोडं लांब राहा. बड्या असामीला भेटाल. त्यामुळे ज्ञानात भर पडेल. पत्नीकडूनही लाभ मिळेल. पार्टनर आकर्षित करेल. रोमांससाठी आजचा दिवस चांगला आहे.

कर्क : तुम्हाला प्रमोशन मिळेल. पण त्यासाठी तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावं लागेल. कार्यक्षेत्रात कुणाच्याही बोलण्यावर जाऊ नका. धर्मकार्यातही भाग घ्याल. त्यामुळे मनशांती मिळेल. तुमच्या यशाचे नवनवे मार्ग उघडे होतील. परंतु काही जुन्या चुकांमुळे तुम्ही त्रस्त व्हाल. प्रवास करताना तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळेल.

सिंह : तुमच्या मनाला वाटेल तसा लाभ मिळेल. तुम्हाला यश मिळेल. पुढे जाण्याची अनेक संधी मिळेल. आज तुमच्या पाचन क्रियेत गडबड होईल. त्यामुळे आजारी असल्यासारखं वाटू लागेल. खाण्यापिण्यावर लक्ष द्या. नाही तर गडबड होईल. संध्याकाळापासून रात्रीपर्यंत प्रियजनांसोबत चांगला दिवस जाईल. आर्थिक व्यवहार करताना जपून. नवदाम्प्त्यांसाठी आज प्रवासाचा योग आहे. प्रेयसीसोबत फिरायला जाल. या रोमांटिक भ्रमणाचा आनंद घ्या.

कन्या : तुम्हाला कुटुंबातील लोकांची साथ मिळेल. एखाद्या धार्मिक कार्यक्रमात भाग घ्याल. मित्रांसोबत मौज मस्ती करत वेळ घालवाल. एखाद्या सरकारी योजनेत पैसा गुंतवलेला असेल तर त्याचा तुम्हाला लाभ मिळेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याने तुम्हाला काही सल्ला दिला तर त्याची तात्काळ अंमलबजावणी करा. तुमच्या मान सन्मानात वाढ होईल. एखादं घर खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होईल.

तूळ : शिक्षण किंवा एखाद्या स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील. संवाद कौशल्याने तुम्हाला मोठा सन्मान मिळेल. धावपळ आणि हवामान यामुळे प्रकृतीवर परिणाम होईल. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. जीवनसाथीचं सहकार्य आणि सहवास लाभेल. प्रवासाला गेल्यावर लाभ होईल. सुखद आणि लाभप्रद स्थिती निर्माण होईल.

वृश्चिक : तुम्हाला आज व्यवसायानिमित्त प्रवासाला जावं लागेल. वाहनांचा प्रयोग करताना सावध राहावं लागेल. जर यापूर्वी कुणाला काही आश्वासन दिलं असेल तर ते पूर्ण करावं लागेल. आज तुम्हाला वडिलांच्या एखाद्या गोष्टीचा राग येऊ शकतो. लोकांचं भलं व्हावं असं तुम्हाला मनापासून वाटेल. पण कार्यक्षेत्रात लोक तो तुमचा स्वार्थ आहे असं समजतील. उद्योग करणाऱ्यांनी कुणालाही पैसे उधार देऊ नयेत. नाही तर दिलेले पैसे परत मिळवताना नाकीनऊ येतील.

धनु : आजचा दिवस तुमच्यासाठी प्रचंड खर्चिक असेल. ऑफिसमध्ये काही कारणांनी तणाव वाढेल. पैशाचा व्यवहार करताना सावधानता बाळगा. नाही तर तुमचे पैसे अडकू शकतात. तुम्हाला आज फालतू कारणाने कोर्टकचेरी करावी लागू शकते. पण शेवटी विजय तुमचाच होईल. मन तणाव मुक्त राहील. आज तुमच्या विरुद्धचे षडयंत्र अयशस्वी होतील.

मकर : एखादं मोठं काम हातात आल्यामुळे तुम्ही अधिक व्यस्त व्हाल. परंतु नोकरी धंद्यातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामात ढिल देऊ नका. घाई गडबड करू नका. कुटुंबातील सदस्यांना घेऊन तुम्ही एखाद्या धार्मिक कार्यात मग्न व्हाल. तुमच्या मुलांसाठी तुम्ही नवीन गाडी विकत घेऊ शकता. जुनी लफडी मागे लागतील. त्यामुळे सावध राहा. घरापर्यंत कोणतंही प्रकरण आणू नका.

कुंभ : अचानक शारीरिक कष्ट पडतील. धावपळ होईल. खर्चही होईल. एखाद्या मालमत्तेची खरेदी विक्री करताना पूर्ण चौकशी करा. मालमत्तेच्या कायदेशीर बाबींचा विचार करा. संध्याकाळी पत्नीची तब्येत सुधारेल. मन प्रसन्न राहील. गावाकडे जाण्याचा योग आहे. विद्यार्थ्यांचा दिवस आज फिरण्यात जाईल. सासू घरी आल्याने कुचंबना होईल.

मीन : मित्रांसोबत आर्थिक व्यवहार कराल. पण हा व्यवहार करताना भांडणं होण्याची शक्यता आहे. उद्योगधंद्यात चढ उतार होईल. कार्यस्थळी एखादी मोठी डील हातातून निघून जाईल. त्यामुळे मोठं नुकसान होईल. आरोग्याच्या तक्रारी उद्भवतील. त्यामुळे त्रस्त व्हाल. कुटुंबात एखाद्या विषयावरून वाद होतील. आजचा दिवस अत्यंत अडचणीचा असाच आहे.

( टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली असून केवळ वाचकां पर्यंत पोहचविणे हा उद्देश. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here