आटपाडी : दुचाकी घसरून झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू

0
34

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहरामध्ये जाधव महाराज मठाजवळ दुचाकी गाडी रस्तावर घसरल्याने झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला. सदरची घटना काल दिनांक ०६ रोजी ११.३० च्या दरम्यान घडली. याबाबत आटपाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, संजय बापू जावीर (वय ४२) रा. कौठूळी हे त्यांच्या ( एम.एच.09बी.वाय-1276) बजाज डिस्कवर दुचाकी वरून आटपाडीहून कौठूळीकडे निघाले होते. त्यांची दुचाकी आटपाडी-दिघंची रस्त्यावरील जाधव महाराज मठा जवळ आली असता गाडी घसरली.

यावेळी मोटरसायकल घसरून रस्त्यावर पडल्याने, पाठीमागे बसलेल्या फुलाबाई लक्ष्मण केंगार रा. गोमेवाडी ही महिला गंभीर जखमी झाली. परंतु यामध्ये गंभीर जखमी झाल्याने फुलाबाई केंगार हिचा यामध्ये मृत्यू झाला. विक्रम संजय जावीर हा गंभीर जखमी झाला.
याबाबत नितीन मोरे यांनी आटपाडी पोलिसात फिर्याद दिली असून, आरोपी संजय बापू जावीर याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.