कुत्र्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तरुणाने तिघांना भोकसले, गुन्हा दाखल

0
80

कोलकत्ता येथे भटक्या कुत्र्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तरुणाने तिघांना भोकसले आहे. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आरोपी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी तरुणाने पती, पत्नी आणि त्यांच्या मुलाला चाकूने वार केला आहे. या हल्ल्येत तिघे जण गंभीर जखमी झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुत्र्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तरुणाने तिघांवर जीवघेणा हल्ला केला. अर्चन भट्टाचार्य असं आरोपी तरुणाचने नाव आहे. बदला घेण्यासाठी अर्चनने खास करून चेन्नीईहून प्रवास केला. कोलकत्या येथील सोनारपूरमध्ये ही घटना घडली. अर्चनने तिघांवर चाकूने वार केला. तिघांना कोलकत्ता येथील एमआर बांगूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिघांवर उपचार सुरु आहे अशी माहिती समोर आली आहे.

गुन्ह्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी आरोपीवर खूनाच्या प्रयत्नासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आले आहे. अर्चन हा आयआयटीतील पहिल्या वर्षात शिकत आहे. गोविंद अधिकारी असं हल्ला झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सोनारपूरच्या चौहाटी परिसरात अधिकारी आणि देबनाथ कुटुंबांमध्ये भटक्या कुत्र्यांना खायला घालण्यावरून वाद सुरु होताच. अनेकदा कुत्रे घरात घुसायचे. त्यामुळे दोन्ही कुटुंबात तणाव निर्माण होत असल्याची तक्रार अधिकारी कुटुंबियांनी केली होती.

मागील काही महिन्यांपूर्वी हा वाद वाढला तेव्हा अधिकारी कुटुंबाने एका भटक्या कुत्र्याला बेदम मारहाण केली. या घटनेत तो जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. देबनाथ कुटुंबातील सदस्याने या घटनेची माहिती अर्चन यांला दिली. अर्चनने कुत्र्याच्या हत्येचा आणि देबनाथ कुटुंबाना त्रास दिल्याचा बदला घेण्याचे ठरवले. त्यानंतर त्यांच्यावर हल्ला केला.