‘या’ दुर्मिळ किटकाची किंमत आहे तब्बल 75 लाख! स्टॅग बीटल इतका महाग का आहे? घ्या जाणून

0
81

जगात असाही एका किटक आहे ज्याची किंमत 75 लाख रुपये आहे. विश्वास बसला नाही ना. पण हो असा एक किटक आहे. ज्याची किंमत लाखांच्या घरात आहे. स्टॅग बीटल असे त्याचे नाव आहे. फार दुर्मिळा असा हा किटक असून, त्याचे जवळपास अस्तित्व असणे शुभ मानले जाते. काही लोकांचा असा विश्वास आहे की स्टॅग बीटल बाळगून माणूस रातोरात श्रीमंत होऊ शकतो.

हे कीटक ‘जंगल परिसंस्थेतील एक महत्त्वपूर्ण घटक मानले जातात. त्यांच्या मोठ्या तोंडामुळे आणि शारिरीक आकारामुळे ते ओळखले जातात,’ असे नुकतेच सायंटिफिक डेटा जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात लिहिले आहे.

आयुर्मान

लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियमनुसार, या कीटकांचे वजन 2-6 ग्रॅम दरम्यान आहे आणि त्यांचे सरासरी आयुष्य 3-7 वर्षे आहे. पुरुष 35-75 मिमी लांब असतात, तर मादी 30-50 मिमी लांब असतात. या किटकांचा औषधी कारणांसाठी देखील वापर केला जातो.

स्टॅग बीटल हे नाव नर बीटलवर आढळणाऱ्या विशिष्ट मॅन्डिबलवरून आले आहे. जे हरणाच्या शिंगांसारखे दिसतात. नर स्टॅग बीटल प्रजनन हंगामात मादीसोबत सोबती करण्याच्या संधीसाठी नर बीटल बरोबर लढत करतात. ज्यात त्यांच्या विशिष्ट शिंगाचा ते आधार घेतात.

कुठे आढळतात?

स्टॅग बीटल उष्ण, उष्णकटिबद्ध वातावरणात वाढतात आणि थंड तापमानात संवेदनशील असतात. ते नैसर्गिकरित्या जंगलात राहतात, परंतु हेजरोज, पारंपारिक बाग आणि शहरी भागात जसे की उद्याने आणि बागांमध्ये देखील आढळतात.

काय खातात?

स्टॅग बीटल प्रामुख्याने गोड द्रवपदार्थ खातात. जसे की, झाडाच्या पानांचा रस आणि सडलेल्या फळांचा रस. ते प्रामुख्याने त्यांच्या जमा झालेल्या उर्जेच्या साठ्यावर अवलंबून असतात, जे त्यांना त्यांच्या प्रौढावस्थेत देखील टिकवून ठेवतात.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here