
राजेंद्र खरात : मंत्री रामदास आठवले यांची उपस्थिती
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : नाशिक येथे होत असणाऱ्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह वर्धापन दिनानिमित्त भव्य ऐतिहासिक राज्यस्तरीय धम्म परिषद व जाहीर सभेस सांगली जिल्हातून हजारो कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती आरपीआयचे सांगली जिल्हाध्यक्ष अध्यक्ष राजेंद्र खरात यांनी दिली.
यावेळी राजेंद्र खरात म्हणाले की, ‘चलो बौद्ध की ओर’ नाशिक असा नारा देत ०२ मार्च रोजी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह वर्धापन दिनानिमित्त भव्य ऐतिहासिक राज्यव्यपी धम्म परिषद व जाहीर सभेचे आयोजन नाशिक येथे करण्यात आले आहे. या धम्म परिषदेस उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत.
स्वागत अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र प्रमुख नाशिक जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे राहणार आहे. या ऐतिहासिक राज्यव्यापी धर्म परिषदेस सांगली जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते जाणार आहेत. सदरची धम्मपरिषद रविवार २ मार्च रोजी हुतात्मा अनंत कान्होरे गोल्फ क्लब मैदान नाशिक येथे होणार आहे.