महिलांसाठी खूप फायदेशीर ठरतात ‘या’ ५ प्रकारच्या बीया, त्वचा-आरोग्याला मिळतील अनेक फायदे!

0
136

सकाळी झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत महिलांची कामं काही संपत नाहीत. घर आणि नोकरी सांभाळून महिलांना शारीरिक आणि मानसिक थकवा येतो. अशात त्यांना ऊर्जेची जास्त गरज भासते. वाढत्या वयासोबत महिलांना आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्याही होतात. कधी हाडं कमजोर होतात तर कधी केसगळती होते. अनेकदा योग्य काळजी न घेतल्यानं कमी वयातच त्वचेवर सुरकुत्याही येऊ लागतात. अशात पोषक तत्व मिळवणं गरजेचं असतं.

 

जर आहार चांगला असेल तर आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर करण्यास मदत मिळते. इतरही अनेक गोष्टींमधून पोषक तत्व मिळवता येतात. अशात आज आम्ही अशा ५ प्रकारच्या बियांबाबत सांगणार आहोत ज्या महिलांना भरपूर पोषण देऊ शकतात. या बियांच्या मदतीनं आरोग्य तर चांगलं राहिलच, सोबतच त्वचेसंबंधी अनेक समस्याही दूर होतील.

 

महिलांसाठी फायदेशीर बीया

अळशीच्या बीया

अळशीच्या बीया आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. या बियांमध्ये पोटॅशिअम, प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं. या बीया नियमितपणे खाल्ल्यास ब्लड प्रेशर कमी होतं, वजन नियंत्रित राहतं आणि पोटासंबंधी अनेक समस्या सहज दूर होतात. यातील फायबरमुळे बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते.

 

चिया सीड्स

अलिकडे बरेच लोक वजन कमी करण्यासाठी चिया सीड्स खातात किंवा पाण्यासोबत पितात. मात्र, चिया सीड्सनं केवळ वजन कमी होतं असं नाही तर आरोग्याला अनेक फायदेही मिळतात. यात अॅंतटी-ऑक्सिडेंट्स आणि ओमेगा-३ फॅटी अॅमसिड असतं. ज्यामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं, वजन कमी होतं, शरीर डिटॉक्स होतं. तसेच त्वचा आणि केसांनाही यानं फायदे मिळतात.

 

भोपळ्याच्या बीया

सामान्यपणे भोपळ्याच्या बीया लोक फेकून देतात. पण अनेकांना याचे फायदे माहीत नसतात. भोपळ्याच्या बीया भाजून खाल्ल्या तर शरीराला अनेक फायदे मिळतात. खासकरून महिलांनी या बियांचा आहारात समावेश करायला हवा. या बियांमध्ये फॉस्फोरस, मोनोसॅच्युरेडेट फॅटी अॅासिड आणि ओमेगा-३ फॅटी अॅहसिड असतं, ज्यामुळे शरीरात वाढलेलं कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत मिळते. सोबतच वजनही कमी होतं.

 

सूर्यफुलाच्या बीया

महिलांनी सूर्यफुलाच्या बीया नियमितपणे खाल्ल्या पाहिले. कारण या बियांमध्ये खनिज, व्हिटॅमिन बी आणि अॅंरटी-ऑक्सिडेंटस असतात. या बीया खाल्ल्यास फ्री रॅडिकल्समुळे होणारं शरीराचं नुकसान टाळता येतं. सोबतच या बीया हृदयासाठी खूप फायदेशीर असतात.

तीळ

तिळाच्या बीया आणि तेलाचा वापर अनेक लोक करतात. तीळ हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. यातील अॅंूटी-इन्फ्लेमेटरी गुण शरीराचा इन्फ्लामेशनपासून बचाव करतात. या बीया खाल्ल्यानं ऑक्सीडेटिव स्ट्रेस दूर करण्यास मदत मिळते.