‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीला मोहम्मद सिराज करतोय डेट

0
158

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराज त्याच्या व्यावसायिक कारकिर्दीमुळे नेहमीच चर्चेत असतो, पण सध्या तो वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

 

नुकताच सिराजचा एका तरुणीसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ही तरुणी म्हणजे सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांची नात जनाई भोसले.जनाई हिने काही दिवसांपूर्वीच आपला २३वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाची एक जंगी पार्टी देण्यात आली. या पार्टीमध्ये अनेक सेलिब्रिटींसह स्वत: आशा भोसलेही हजर होत्या.

 

या चर्चा रंगल्यानंतर जनाई हिने थेट इन्स्टा स्टोरी पोस्ट करत सिराजला ‘मेरे प्यारे भाई’ असे संबोधले. त्यामुळे या दोघांबद्दल सुरु असलेल्या अफेअरच्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला.दरम्यान, सिराजच्या लव्ह लाइफबद्दल सध्या एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. एका सौंदर्यवतीशी सिराजचे नाव जोडले जात असून ती एक उत्तम अभिनेत्रीदेखील आहे.

 

सिराज हा अभिनेत्री माहिरा शर्माला डेट करत आहे. रिपोर्ट्समध्ये याबाबत दावा करण्यात आला आहे. यामागे एक खास कारणही सांगण्यात आले आहे.गेल्या वर्षी, सिराजने माहिराच्या एका फोटोवर कमेंट केली होती. त्यानंतर सिराज आणि माहिरा यांच्यात काहीतरी शिजतंय अशा चर्चा क्रिकेटवर्तुळात आणि सिनेवर्तुळात सुरु झाल्या.हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत. पण दोघांपैकी कोणीही अद्याप याबद्दल कोणतेही उत्तर दिलेले नाही.

 

माहिरा शर्मा ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती बिग बॉस सीझन १३ मध्ये दिसली आणि तिथून ती अधिक प्रसिद्ध झाली. तिने कुमकुम भाग्य आणि नागिनमध्येही अभिनय केला आहे.