जिच्याशी लग्न ठरलं होतं त्याच महिलेवर होणाऱ्या पतीने केला बलात्कार, मित्रांना बरोबर घेऊन केली मारहाण

0
655

 

जिच्याशी लग्न ठरलं होतं त्याच मुलीला बरोबर नेत तिच्यावर तिच्याच होणाऱ्या पतीने बलात्कार केला. त्याआधी तिच्या शरीरावर असंख्य चावे घेतले. बलात्कार करुनच हा नराधम थांबला नाही तर त्याने तिला मित्रांच्या हवाली केलं. या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. २२ वर्षांच्या पीडितेच्या आईने पोलिसात तक्रार केल्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली.

पोलिसांनी काय माहिती दिली?
Rape on Finance पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या मुलीशी लग्न ठरलं होतं तिला तिचा होणारा नवरा ऋषिकेश या ठिकाणी घेऊन गेला. तिथे नेल्यानंतर त्याने तिचं शोषण केलं, तिला जनावराप्रमाणे चावला आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने या मुलीला मित्रांच्या हवाले केलं. त्यांनीही तिचं शोषण केलं आणि तिला मारहाण केली. या घटनेनंतर पीडिता जेव्हा तिच्या घरी आली तेव्हा तिने तिच्या आईला घडला प्रकार सांगितला. ज्यानंतर आईने पोलिसात धाव घेतली.

ही घटना कुठे घडली?
ही धक्कादायक घटना गाझियाबादमध्ये घडली आहे. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी शोध मोहीम राबवून चार जणांना या प्रकरणात अटक केली. पोलीस उपायुक्त राजेश कुमार यांनी याबाबत माहिती दिली आहे.

पोलिसांनी काय सांगितलं?
पोलीस उपायुक्त राजेश कुमार म्हणाले, “आम्ही पीडितेची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर तिचा जबाब नोंदवून घेतला आहे. या पीडितेने न्यायालयात सांगितलं की तिचा होणारा नवरा तिला ऋषिकेशला घेऊन गेला. तिथे हॉटेल रुमवर नेऊन त्याने बलात्कार ( Rape on Finance ) केला. दुसऱ्या दिवशी सकाळी परतत असताना त्याने त्याच्या तीन मित्रांना बोलवून घेतलं होतं. ज्यांनी मला मारहाण केली.” या प्रकरणात पोलिसांनी कलम ३०९, कलम ११८ (१), कलम ७४ आणि कलम ८७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पीडितेच्या आईने नेमकं काय सांगितलं?
या प्रकरणात  पीडितेच्या आईने पोलिसांना सांगितलं ही घटना २१ ऑगस्टची आहे. साधारण पाच वाजण्याच्या सुमारास तिचा होणारा नवरा तिला ऋषिकेशला घेऊन गेला. त्यावेळी त्याने तिचा फोन स्वतःजवळ घेतला होता. माझी मुलगी जेव्हा फोनबाबत विचारु लागली तेव्हा त्याने तिचा फोन फोडून टाकला. त्यानंतर तिला मारहाण केली, तिच्यावर बलात्कार केला. गाझियाबाद येथील पेट्रोल पंपाजवळ तिला सोडलं होतं असं पीडितेच्या आईने सांगितलं आहे. यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला.