ताज्या बातम्या

अन चालत्या रेल्वेतच बेशुद्ध झाला लोको पायलट

वाढत्या उष्णतेमुळे मालगाडीचा लोको पायलट बेशुद्ध पडला. कारण इंजिनमध्ये 55 डिग्री पर्यंत तापमान पोहोचले होते. सतत 9 तास डयुटी केल्यानंतर पायलटला चालत्या ट्रेनमध्ये चक्कर येऊन उलट्या व्हायला सुरुवात झाली. ज्यामुळे तो अचानक कोसळला.

उत्तर प्रदेशमधील महोबा जिल्यामध्ये तापमान 47 डिग्री पोहचले आहे. उष्णतेमुळे लोकांना घराच्या बाहेर निघणे मुश्कील झाले आहे. तर या दरम्यान मालगाडीमधील लोको पायलट बेशुद्ध पडला कारण इंजिनमध्ये तापमान 55 डिग्री पर्यंत पोहचले व यामुळे चालत्या रेल्वेमध्ये हा लोको पायलट खाली कोसळला.

सूचना मिळताच वेळेवर अँब्युलन्स बोलवण्यात आली . व तातडीने त्याला रुग्नालयात नेण्यात आले. जिथे त्याच्यावर उपचार सुरु आहे. महोबा स्टेशनवर ही मालगाडी कमीतकमी 4 तास उभी राहिली. दुसरा लोको पायलट आल्यानंतर मालगाडी महोबा वरून बांदा रवाना झाली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button