कुत्र्याकडून चुकून स्टोव्हचं बटण दाबलं गेलं, पुढे काय झाल ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल

0
124

घरात पाळीव कुत्रं ठेवणे हे खूप मोठ्या जबाबदारीचे काम असतं. कुत्र्यांकडून देखील कधीकधी चूकून गोष्टी घडतात. पाळीव कुत्र्याने कधी बेडवर पाणी साडले तर कधी घरच्या मौलवान वस्तूचे नुकसान केल्याचे अनेक व्हिडिओ आपण आजवर पाहिले आहे. परंतु अमेरिकेच्या कोलोरॅडो स्प्रिंगमध्ये कुत्र्याने चक्क घराला आग लावली आहे. मध्यरात्री स्वयंपाक घरात असलेल्या स्टोव्हचं बटण चूकून कुत्र्याकडून दाबले गेले आणि त्यानंतर घराला आग लागल्याची घटना घडली. ही घटना घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २६ जून रोजी घडली आहे. रात्रीच्या सुमाराच पाळीव कुत्रा स्वयंपाक घरात गेला. स्टोव्हवर असलेल्या बॉक्सची तपासणी करण्यासाठी स्वयंपाक घरात आला. बॉक्सची तपासणी करण्यासाठी कुत्र्याने दोन्ही पाय ओठ्यावर ठेवले. तेवढ्यात चूकून त्याचा धक्का स्टोव्हच्या बटणाला लागला. तेवढ्यात तो निघून गेला. स्टोव्हचे बटण दाबताच, आग लागली. आग हळूहळू वरती पसरली.

 

आग लागताच, घरात अर्लाम वाजू लागला. अर्लाममुळे घराच्या सदस्यांना घटनेची माहिती मिळाली. आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. पहाटे 4.45 सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. व्हिडिओ पाहून अनेकांना हसू आवरेना तर काहींनी मालक बेजवाबदार असल्याचे सांगत आहे.

पाहा व्हिडिओ:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here